Propose Day 2021 : प्रपोज करण्याआधी 'या' गोष्टी माहीत नसतील तुम्हालाही मिळू शकतो नकार; जाणून घ्या हा 'सिंपल फंडा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 11:24 AM2021-02-08T11:24:47+5:302021-02-08T11:25:42+5:30
Propose Day 2021 Tips: प्रपोज करताना आपल्या आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळू नये. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
कालपासून व्हेलेंटाईन वीक1(valentines week 2021) ला सुरूवात झाली आहे. काल रोज डे नंतर आज सगळेच कपल्स प्रपोज डे (Propose Day 2021) आनंदानं साजरा करतील. या दिवशी एखाद्या मुलावर किंवा मुलीवर क्रश असेल तर तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न लोक नक्की करतील. तर जे कपल्स आधीपासूनच रिलेशनशीपमध्ये आहेत. ते आपल्या पार्टनरला नव्यानं प्रपोज करून जुन्या आठवणींना उजाळा देतील. प्रपोज कसं करायचं हे सगळ्यांना माहीत असतं. पण प्रपोज करताना आपल्या आवडत्या व्यक्तीकडून नकार मिळू नये. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
आज आम्ही तुम्हाला अशा कोणत्या टिप्स आहेत. ज्यांचा वापर केल्यानं होकार मिळणं अधिक सोपं होईल. आता फेसबुक, व्हॉट्सएपसारख्या सोशल मीडिया तसेच वेगवेगळ्या माध्यमातून 'मन की बात' केली जाते. पण कोणत्याही पध्दतीने प्रपोज (propose day 2021 Celebration) कराल तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
१) प्रपोज करायच्या आधी तुमच्या ड्रिम गर्लच्या आवडीनिवडींबाबत जाणून घ्या. त्या मुलीच्या आयुष्यात कोणी आहे का हे आधी जाणून घ्या. तसंच ती मुलगी कोणाला पसंत करते का हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
२) कोणतंही नातं वेळेनुसार जास्त घट्ट आणि मजबूत होत जातं. त्यामुळे तुम्ही त्या मुलीसोबत खूप जास्त प्रेम करता हे उताविळपणे सांगायला जाऊ नका. तुमचं वागणं, स्वभाव त्या मुलीला समजण्याचा चान्स द्या नंतर तुम्ही तुमच्या नात्याला पुढे कंटिन्यू करू शकता.
३) तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे याची जाणीव करून द्या. पार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
४) तुम्ही तुमच्या पार्टनरला या गोष्टीची जाणीव करून दया की तुम्ही तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सूक आहात. नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सुद्धा पार्टनरला सांगू शकता.
५) जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कराल तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश दोघांमध्ये करू नका. कारण त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते.
६)प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे आणि क्रियेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा. Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....
७) प्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला. प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे आणि क्रिेयेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा. Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!