रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:41 IST2018-12-20T16:39:59+5:302018-12-20T16:41:15+5:30
बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला.

रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!
बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला. त्याला त्यांसंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले आणि अजूनही विचारले जात आहे. लग्न कधी आणि कुठे होणार यापासून ते लग्नात जेवायला काय होतं? या सर्व चर्चा झाल्या. पण नुकत्याच झालेल्या लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड शोमध्ये रणवीर सिंगने सुखी वैवाहिक जीवनाचं त्याचं गुपित काय आहे, याचा खुलासा केला.
रणवीर सिंग आणि दीपिका पोदुकोन या दोघांचं एकमेकांवरील प्रेम कधीही कुणापासून लपून राहिलं नाही आणि त्यांनी कधी लपवून ठेवलंही नाही. दोघांच्याही लाजवाब केमिस्ट्रिची उदाहरणे दिली जाऊ लागली. इतकेच नाही तर नवरा असावा तर रणवीर सिंगसारखा प्रेम करणारा असावा, असाही एक सूर सोशल मीडियात बघायला मिळाला. पण लग्न म्हटलं की, चांगल्या गोष्टींसोबतच काही अडचणीही असतातच. आजही अनेकजण सुखी वैवाहिक जीवनाचा फंडा कुठे सापडेल का? याचा शोध घेत असतात. पण हाचं फंडा अगदी सोप्या भाषेत रणवीर सिंगने लोकमतच्या अवॉर्ड शोमध्ये सांगितला.
रणवीर सिंगला सुखी वैवाहिक जीवनाचा फंडा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, 'कोणत्याही गोष्टीत तुमच्याआधी पत्नीला महत्त्व द्या. कोणताही निर्णय घेताना तिला पुढे ठेवा. तसेच तिच्या कोणत्याच गोष्टीला कधीही नाही म्हणून नका. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेऊन गोष्टी मॅनेज करतो. मग ते फॅशनबाबत असो वा इतरही कोणत्या गोष्टी करण्याबाबत असो. समतोल महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणानं आवर्जून लग्न करावं, असा सल्लाही मी देतो', अशा शब्दात त्याने त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचं गुपित शेअर केला.
त्यासोबतच हा नोव्हेंबर महिना त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंद देणारा आणि मनभरुन भावूक करणारा ठरला, असंही तो म्हणाला. कारण या लग्नाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्याला आनंद, आनंदाचे अश्रू, प्रेम हे सगळं मिळालं. दीपिकाला जसं हवं होतं, तसंच लग्न करण्याची इच्छाही पूर्ण करायला मिळाली, याचाही आनंद त्याच्या बोलण्यातून झळकत होता.