रीवाचा झाला रवींद्र जडेजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2016 11:21 AM2016-04-17T11:21:17+5:302016-04-17T17:16:43+5:30

क्रिकेटर रवींद्र जडेजा आज रविवारी रीवा सोलंकी हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. 

Ravichandran Ravindra Ravindra Jadeja | रीवाचा झाला रवींद्र जडेजा

रीवाचा झाला रवींद्र जडेजा

Next
रिकेटर रवींद्र जडेजा आज रविवारी रीवा सोलंकी हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. राजकोट येथील एका हॉटेलात हा अलिशान सोहळा पार पडला. तत्पूर्वी राजवाडी थाटात जडेजा फुलेकूवर(वरात) निघाला. फुलेकूनंतर कारमध्ये बसून जडेजा लग्न सोहळा होत असलेल्या हॉटेलात पोहोचला. घोडीवर बसण्यापूर्वी जडेजा सासºयाने भेट दिलेल्या आॅडी कारमधून घरातून निघाला. ही कार गुलाबांनी सजवली होती. गुजराती राजपूत लग्नात वधू पक्षाचे लोक वरास तलवार भेट देतात. याला तलवार विधी म्हणतात. यासोबतच घरातून वधूची विदाईही होते आणि लग्नानंतरच ती घरी परतू शकते. हाच विधी पूर्ण करण्यासाठी रीवाच्या घरूनही विदाई झाली होती.
रवींद्र जडेजाच्या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असताना आम्ही या सोहळ्याचे काही खास छायाचित्रे आमच्या हाती लागली आहेत.   तेव्हा बघाच ही छायाचित्रे.






रवींद्र जडेजाचे लग्न ‘वांद्यात’!
क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याचा आज रविवारचा लग्नसोहळा चांगलाच वांद्यात सापडला. जडेजाची वरात वधूमंडपी पोहाचणार तोच, वरातीतील जडेजाच्या एका नातेवाईकाने आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. साहजिकच पोलिस घटनास्थळी आले व आनंदात काहीसे विरजन पडले. जडेजाच्या एका नातेवाईकाने हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुभकार्यांत हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्याची प्रथा असली तरी हे गैर आहे. बंदुकीचा परवाना असतानाही तिचा अशाप्रकारे वापर अवैध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लोधिका पोलिस ठाण्याचे पीएसआय महेन्द्रसिंह राणा यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या कंट्रोलरूम कडून माहिती मिळाली. आम्ही फुटेज तपासत आहोत. बंदुकीचा परवाना असला तरी ती केवळ स्वसुरक्षेच्या स्थितीतच वापरली जाऊ शकते. तिचा अवैध वापर झाल्याचे सिद्ध झाल्याच आरोपींना ३ वर्षे कारवासाची शिक्षा होऊ शकते.
 


Web Title: Ravichandran Ravindra Ravindra Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.