Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:02 AM2017-09-08T11:02:48+5:302017-09-08T16:32:48+5:30
नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.
Next
आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघेही खूप प्रयत्न करतात. त्यासाठी ते एकमेकांना गिफ्ट देतात, बाहेर फिरायला जातात मात्र बऱ्याचदा अगदी शुल्लक कारणांनी दोघांत भांडण-तंटे होतात आणि नात्यात दूरावा निर्माण होतात. नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.
* तुलना करणे
लग्नानंतर बरीच वर्ष झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांच्या चुका काढून दुसºयाशी तुलना करु लागतात. विशेषत: महिला आपल्या पतीच्या कामाच्या आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपल्या भावाशी किंवा अन्य व्यक्तीसोबत तुलना करते ज्यामुळे वेळोवेळी तंटे होतात.
* पैशांवर चर्चा
घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र जेव्हा महिला नेहमीच आपल्या पतीशी पैशांच्या बाबतीत चर्चा करीत असेल आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत असेल तर नाते बिघडू शकते. नात्यात प्रेम टिकवून ठेवायचे असेल तर कधी पैशांना मध्ये येऊ देऊ नका.
* संताप करणे
आॅफिसमध्ये काम करताना मानसिक तणाव येत असतो ज्याकारणाने बऱ्याचदा घरी आल्यानंतर पतीची कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, मात्र महिला ही गोष्ट समजत नाही आणि पूर्ण दिवसाच्या सर्व गोष्टी आपल्या पतीला ऐकवायला बसते, ज्याकारणाने पती रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि भांडणाला सुरुवात होते. अशावेळी महिलांनी कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करावी याचे भान ठेवावे, मात्र पुरुषांनाही आपल्या आॅफिसचा ताण घरापर्यंत न आणता आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठीही वेळ काढावा.
* दिवसाची सुरुवात
बहुतांश महिलेस सकाळी खूप कामाचा व्याप असतो, त्यात मुले व पतीसाठी ब्रेकफास्ट तयार करणे, स्वत:ची तयारी करणे आणि घराची साफसफाई करणे, मात्र या कामांसाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. याच चिडचिडसोबत ती जेव्हा पतीशी बोलते तेव्हा दोघांत वाद निर्माण होतो.
* रुची संपणे
नव्याचे नऊ दिवस असे म्हणतात, त्यानुसार लग्नाच्या सुरुवातीलाच दोघांत रुची दिसून येते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांत एकमेकांबद्दलची रुची कमी होऊ लागते. यामुळेच नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.