Relation : ‘या’ फायद्यांमुळे मुलांना आवडते ‘लिव्ह इन...' मध्ये राहणे !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 12:35 PM2017-09-12T12:35:53+5:302017-09-12T18:05:53+5:30

लिव्ह-इनमध्ये राहण्याचे इतरही सकारात्मक फायदे आहेत. काही मुख्य कारणांमुळे मुलांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची अधिक इच्छा होते. जाणून घ्या ती कारणे

Relation: 'Benefits' children love 'live in ...' staying in! | Relation : ‘या’ फायद्यांमुळे मुलांना आवडते ‘लिव्ह इन...' मध्ये राहणे !

Relation : ‘या’ फायद्यांमुळे मुलांना आवडते ‘लिव्ह इन...' मध्ये राहणे !

Next
्याच चित्रपटांचा आशय हा लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे. विशेषत: असे चित्रपट तरुणाईवर आधारित असल्याने या चित्रपटांकडे तरुणवर्ग जास्त खेचला जातो. सध्या बदलत्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून ‘लिव्ह इन...’ कडे पाहिले जाते. एकंदरीत सध्याच्या तरुणाईलाही लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणे अधिक आवडते. यामध्ये लोक स्वत:ला अधिक कम्फर्टेबल मानतात. लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहिल्याने आपल्या जोडीदाराविषयी अनेक गोष्टी समजून घेता येतात असे मुलांना वाटते. या गोष्टी पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी ठरतील असेही त्यांना वाटते.
लिव्ह-इनमध्ये राहण्याचे इतरही सकारात्मक फायदे आहेत. खालील काही मुख्य कारणांमुळे मुलांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची अधिक इच्छा होते. 
 
* प्रेम वाढते 
लिव्ह-इनमध्ये राहिल्याने एकमेकांच्या सहवासात एकमेकांचे गुणदोष समजून घेणे शक्य होते. शिवाय दोघांना एकमेकांसाठी भरपूर वेळ देता येतो म्हणून दोघांमधील प्रेम अधिक वाढते. यामुळे त्यांचे नाते दृढ होते आणि भविष्यात एकमेकांपासून लांब होण्याची शक्यता कमी होते. 

* एकमेकांच्या कामात सहभाग वाढतो
लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहताना तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल तरी मिळून काम करावे लागते, यामुळे काम वाटून घेण्याची सवय लागते. शिवाय एकमेकांच्या कामात एकमेकांचा सहभाग वाढतो, यातच एकमेकांचा स्वभाव देखील कळतो. 

* लग्नापूर्वीच संसारिक आयुष्याचा अनुभव 
लिव्ह-इनमध्ये राहिल्याने प्रेम तर वाढतेच शिवाय संसारिक आयुष्याचा अनुभव मिळतो. या कारणामुळे मुले मुलींच्या तुलनेत लिव्ह-इनला जास्त पसंती देतात. 

* पैशांची समस्या जाणवत नाही
मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी लिव्ह-इनमध्ये राहतात. या अनुभवातून दोघेही एकमेकांना समजून घेतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या एकमेकांना सांभाळून घेण्याची जबाबदारीही दोघे मिळून घेतात. दोघेही नोकरी करणारे असतील तर समस्या अधिक सोपी होते.  

* भविष्याचे नियोजन करता येते
लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर दोघांना पुरेसा वेळ मिळतो त्यामुळे एकमेकांचे प्रेम तर वाढतेच शिवाय भविष्याचेही नियोजन करायलाही दोघांना वेळ मिळतो. त्यामुळे बऱ्यापैकी अचूक नियोजन करता येते.  

Web Title: Relation: 'Benefits' children love 'live in ...' staying in!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.