Relation : आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:18 AM2017-09-14T10:18:09+5:302017-09-14T15:48:09+5:30
बहुतांश घटस्पोट होण्याचे मोठे कारण पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले नाते हेच समजले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की, पत्नी बाहेर नाते बनवू शकत नाही.
नाते जास्त काळ टिकविण्यासाठी त्यात प्रेम आणि विश्वास असणे आवश्यक असते. मात्र नात्यात या दोन्हा गोष्टी कमी झाल्या तर ते नाते तुटू लागते. अशातच पती-पत्नी दोघांपैकी कोणीतरी एकजण बाहेर नाते निर्माण करतो आणि पार्टनरला धोका देऊ लागतो. बहुतांश घटस्पोट होण्याचे मोठे कारण पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले नाते हेच समजले जाते, मात्र याचा अर्थ असा नाही की, पत्नी बाहेर नाते बनवू शकत नाही. याचा तपास करणे खूप आवश्यक आहे. अशात जर पत्नीच्या व्यवहारात थोडाही बदल जाणवत असेल तर समजावे की, ती आपणास धोका देत आहे.
* चर्चा करण्याची पद्धत
जर पत्नीच्या चर्चा करण्याची पद्धतीत बदल दिसत असेल आणि ती प्रत्येक वेळी तुमच्या प्रश्नांची उलट-सुलट उत्तर देत असेल तर समजावे की ती आपणास धोका देत आहे.
* व्यवहार
प्रेम करणारी पत्नी आपल्या पतीची जेवणापासून सर्वच गोष्टींची काळजी घेते आणि दिवसातून दोन-तीन वेळा फोन करुनही पती व्यवस्थित आहे का या बाबत विचारच असते, मात्र जेव्हा पत्नीचा व्यवहार अचानक बदलला असेल आणि आपल्याकडे लक्ष देणे बंद केले असेल तर समजावे की ती दुसऱ्या नात्यात सुखी आहे.
* मैत्रिणींसोबत वेळ
‘एक्सट्रा अफेयर’ नंतर जेव्हा महिलांना बाहेर फिरायला जायायचे असेल तर ती आपल्या मैत्रिणींना भेटण्याचे निमित्त बनविते. जर प्रत्येक दिवशी पत्नी हेच कारण सांगत असेल तर समजावे की, नात्यात धोका निर्माण झाला आहे.
* नवा मित्र
आॅफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचे पुरुष मित्र असणे सामान्य गोष्ट आहे मात्र जेव्हा आपली पत्नी नेहमी एखाद्या पुरुषाची प्रशंसा करीत असेल तर हा देखील एक संकेत आहे की पत्नी धोका देत आहे.
* सोशल मीडियाचा वापर
इंटरनेटच्या या युगात बहुतांश लोक फेसबुक आणि ट्विटरचा वापर करतात, मात्र जर आपली पत्नी जास्त वेळ सोशल मीडियामध्ये व्यस्त असेल आणि नवीन मित्र बनवित असेल तर समजावे की काही तरी चुकत आहे.
* फोनवर गप्पा
रात्रीच्या वेळी जर पत्नी सांगत असेल की, तिच्या मैत्रिणीचा किंवा नातेवाईकांचा फोन आहे आणि ती एकांतात बसून जास्त वेळ बोलत असेल तर सावध व्हायला हवे.
Also Read : Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !