पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:44 PM2018-07-10T12:44:02+5:302018-07-10T12:44:47+5:30
मुली आता स्वत:हून आत्मविश्वासाने मुलांसोबत बोलण्याची आणि त्यांना प्रपोज करण्याची हिंमत ठेवतात.
आजच्या मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीयेत. मग तो करिअरचा विषय असो वा आपल्या आवडीचा पार्टनर निवडण्याचा विषय असो, मुली सगळ्याच गोष्टीत बिनधास्त असतात. मुली आता स्वत:हून आत्मविश्वासाने मुलांसोबत बोलण्याची आणि त्यांना प्रपोज करण्याची हिंमत ठेवतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मुली पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टी नोटीस करतात.
१) बॉडी लॅंग्वेज
पहिल्या भेटीत मुली मुलांच्या बॉडी लॅंग्वेजकडे फार बारकाईने लक्ष देतात. मुलगा कशाप्रकारे चालतो, त्याचे हावभाव कसे आहेत, बसतो कसा, हातांच्या मुव्हमेंट कशा करतो या गोष्टी मुली बारकाईने बघतात. यावरुन त्या मुलगा किती कॉन्फिडेंट आहे हे तपासत असतात.
२) बोलण्याची पद्धत
रिलेशनशिपच्या काही वर्षांनंतर मुलगा कसा बोलतो याने मुलींना काही फरक पडत नाही. पण पहिल्या भेटीत मुलाची बोलण्याची पद्धत मुली बारकाईने बघतात. जर तुम्ही हॉटेलमध्ये भेटत असाल तर तुम्ही वेटरला कशी हाक मारता हेही त्या नोटीस करतात.
३) दिखावा
काही मुलं हे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी ब्रॅन्डेड कपडे, अॅक्सेसरीज घालून जातात. सतत स्टेटस आणि ब्रॅन्डच्या गोष्टी करतात. यावरुन त्या मुलाच्या स्वभावाचा साधारण अंदाज येतो. अशा मुलांना काही मुली पहिल्या भेटीतच रिजेक्ट करतात.
४) जे परिवाराबाबत बोलतात
काही मुलींना परिवारा प्राधान्य देणं फार आवडतं. त्यामुळे काही मुली या मुलांमध्ये याही गोष्टींचं निरीक्षण करतात. मुलाच्या आयुष्यात परिवाराचं काय महत्व आहे हे त्या बघतात.
५) आईचा लाडका
पहिल्या भेटीत जर मुलगा आईबाबत सतत बोलत असेल तर मुली समजून जातात की, हा मुलगा आईचा लाडका आहे. काही मुलींना असे मुलं आवडतात पण काहींना आवडत नाहीत.