टक्कल असलेल्या पुरूषांबाबत महिलांचं हे मत वाचून बसेल धक्का, रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 02:21 PM2023-07-13T14:21:03+5:302023-07-13T14:26:57+5:30

Relationship : सध्या पुरूषांना केसगळती आणि टक्कल पडणे अशा समस्या खूप भेडसावत आहेत. या लोकांना चिंता असते की, त्यांचं टक्कल पडलं तर तरूणी त्यांच्याकडे बघणार नाही किंवा त्यांच्याकडे आकर्षित होणार नाहीत.

Relationship : Bald men are considered more attractive by women than men with hair know the reason | टक्कल असलेल्या पुरूषांबाबत महिलांचं हे मत वाचून बसेल धक्का, रिपोर्टमधून खुलासा

टक्कल असलेल्या पुरूषांबाबत महिलांचं हे मत वाचून बसेल धक्का, रिपोर्टमधून खुलासा

googlenewsNext

Relationship : कोणत्या व्यक्तीला कशाचं आकर्षण वाटेल हे कुणीही सांगू शकत नाही. कारण सगळ्यांचे विचार-स्वभाव वेगवेगळे असतात. एखादी व्यक्ती आवडण्याबाबतही हाच नियम लागू पडतो. सध्या पुरूषांना केसगळती आणि टक्कल पडणे अशा समस्या खूप भेडसावत आहेत. या लोकांना चिंता असते की, त्यांचं टक्कल पडलं तर तरूणी त्यांच्याकडे बघणार नाही किंवा त्यांच्याकडे आकर्षित होणार नाहीत.

मात्र, टक्कल असलेल्या पुरूषांसाठी एका रिसर्चमधून आनंदाची बाब समोर आली आहे.  रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही तुमच्या केसगळतीच्या समस्येने हैराण आहात तर चिंता करु नका. कारण अनेक महिलांना बाल्ड म्हणजेच टक्कल असलेले पुरूष हॉट वाटतात. 

टक्कल असण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. अनेक पुरूषांना केवळ टाळूवरच केस नसतात आणि डोक्याच्या इतर भागावर केस असतात. तेच काही पुरूष असे असतात ज्यांच्या डोक्याच्या वेगवेगळ्या भागातील केस नाहीसे होतात. काही पुरूष आपलं टक्कल लपवण्यासाठी शिल्लक असलेल्या केसांनी केस नसलेली जागा झाकण्याचा प्रयत्न करतात. पण याने काहीही होत नाही. अशात पूर्णपणे टक्कल करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण कोणताही निर्णय घेण्याआधी याबाबत काही सत्य जाणून घ्या. 

साधारण 25 टक्के पुरूष हे वयाच्या ३०व्या वर्षानंतर टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. काही लोकांनी ही समस्या आनुवांशिकतेमुळे येते. काही पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं कारण आनुवांशिकता नाही तर वेगवेगळी असतात. त्यांना ही समस्या स्ट्रेस, पोषक तत्वांची कमतरता, डोक्याच्या त्वचेची समस्या यामुळेही होऊ शकते.

एका रिसर्चनुसार, 1 हजार महिलांना तीन प्रकारचे पुरूष दाखवण्यात आले. पहिल्यात असे पुरूष होते ज्यांना डोक्यावर पूर्ण केस होते. दुसऱ्यात प्रकारातील पुरुषांना थोडे टक्कल पडलेले होते तर तिसऱ्या प्रकारातील पुरूष हे पूर्णपणे टक्कल पडलेले होते. अशात 1 हजार महिलांपैकी जास्तीत जास्त महिलांनी तिसऱ्या म्हणजे पूर्ण टक्कल असलेल्या पुरुषांना जास्त मतं दिली. 

काही महिलांनुसार, पूर्णपणे टक्कल असलेले पुरूष हे इतरांच्या तुलनेत जास्त शक्तीशाली, मजबूत आणि उंच वाटतात. इतकेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी ते सहज दुसऱ्यांना आकर्षित करतात. 

काही महिलांनी आपलं मत मांडताना सांगितलं की, त्यांना अर्धवट टक्कल अजिबात पसंत नाही. एकतर पुरूषांच्या डोक्यावर योग्यप्रकारे केस असावेत नाही तर पूर्णपणे टक्कल असावं. तसेच केसगळतीच्या समस्येने हैराण पुरुष हे शिल्लक राहिलेले केस कापून अधिक आकर्षक दिसू शकतात. 
असं असलं तरी याचे काही तोटेही आहेत. काही महिलांना आपल्या उत्तरात सांगितले की, पूर्णपणे टक्कल असलेले पुरुष हे त्यांच्या वयापेक्षा चार वर्षांनी अधिक वयस्कर वाटतात. 

Web Title: Relationship : Bald men are considered more attractive by women than men with hair know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.