कपलने बनवले असे 10 नियम ज्यांमुळे गेल्या 6 वर्षात कधीच नाही झालं भांडणं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 05:31 PM2023-09-07T17:31:07+5:302023-09-07T17:31:49+5:30
Relationship : दोघांनी मिळून 10 गोल्डन नियम तयार केले. ज्यांचं पालन दोघांनाही करायचं असतं. त्यांचा दावा आहे की, या नियमांमुळे त्यांच्यात गेल्या 6 वर्षापासून त्यांच्यात भांडण झालं नाही.
Relationship : पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात वाद होतोच. कुणाला एखादी बाब पसंत नसते. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. यापासून वाचण्यासाठी एका कपलने एक अनोखी आयडिया काढली आहे. दोघांनी मिळून 10 गोल्डन नियम तयार केले. ज्यांचं पालन दोघांनाही करायचं असतं. त्यांचा दावा आहे की, या नियमांमुळे त्यांच्यात गेल्या 6 वर्षापासून त्यांच्यात भांडण झालं नाही.
सोशल मीडिया साइट टिकटॉकवर जिया नावाच्या महिलेने या गोल्डन नियमांचा खुलासा केला आहे. म्हणाले की, आमच्याकडे लपवण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आम्ही दोघेही आमचं लोकेशन एकमेकांना शेअर करतो. याने आम्हाला वाटतं आणि वाटतं की, जर कुणाला काही झालं तरी काही अडचण नाही. दुसरा नियम म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडला स्ट्रिप क्लबमध्ये जाण्याची परवानगी नाही. कारण ते योग्य नाही. तिसरा नियम म्हणजे मला तो ला मित्रांसोबत कुठेही गेला तरी काही अडचण नाही. तसेच मी मैत्रिणींसोबत कुठे गेले तर त्याला अडचण नाही.
जिया म्हणाली की, आम्ही फार कमी वयात डेटिंग सुरू केलं होतं. त्यामुळे आम्हा दोघांना वाटतं की, आपलं काम करणं फार महत्वाचं आहे. जर मा मैत्रिणींसोबत कुठे जायचं असेल तर मी जाणार. जर त्याला मित्रांसोबत जायचं असेल तर तो जाऊ शकतो.
पुढचा नियम म्हणजे आम्ही सोशल मीडिया अॅप जसे की, इन्स्टावर हे कधीच दाखवत नाही की, आम्ही एकमेकांवर खूप जीव ओवळतो. पाचवा नियम आहे की, ना मला एखाद्या तरूणाच्या जवळ जाणं आवडतं ना त्याला एखाद्या मुलीजवळ. याची काळजी आम्ही दोघेही घेतो.
सहाव्या नियमाबाबत जियाने सांगितलं की, आम्ही मित्र बनवू शकतो, पण सगळ्यात चांगले नाही. कारण सगळ्यात चांगले मित्र-मैत्रीण आम्ही स्वत:च आहोत. आम्हाला एकमेकांच्या प्रायोरिटी माहीत आहेत. सीमा माहीत आहेत.
सातवा नियम म्हणजे क्लबमध्ये जाण्यास दोघांनाही समस्या नाही. जिया म्हणाली की, मी गर्ल्स नाइट्स आणि मजेसाठी क्लबमध्ये जाते. तोही जातो मला काही अडचण नाही.
आठवा नियम आणि महत्वाचा नियम म्हणजे आम्ही एकमेकांसोबत फोनचे पासवर्ड शेअर करतो. जिया म्हणाली की, जर तुम्ही नात्यात असाल तर तुम्ही काहीच लपवायला नको.
नववा नियम म्हणजे आम्ही अश्लील गोष्टी कोणत्याच बघत नाही. हे आमच्या नात्यासाठी घातक आहे. जियाने 10व्या आणि शेवटच्या नियमाबाबत सांगितलं की, आम्ही तोपर्यंत लग्न करणार नाही जोपर्यंत माझा बॉयफ्रेंड आर्थिक रूपाने स्वतंत्र होत नाही.