Relationship : मनात 'हे' विचार येत असतील तर फायद्याचं ठरेल ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 04:28 PM2023-09-26T16:28:21+5:302023-09-26T16:28:44+5:30

Relationship : ही ब्रेकअपची पहिली स्टेज असते. यात आपण आपल्या ब्रेकअपबाबत स्पष्ट नसतो आणि स्वत:ला यासाठी तयार करत असतो. 

Relationship : If something troubling you again and again then break right way | Relationship : मनात 'हे' विचार येत असतील तर फायद्याचं ठरेल ब्रेकअप!

Relationship : मनात 'हे' विचार येत असतील तर फायद्याचं ठरेल ब्रेकअप!

googlenewsNext

Relationship : आपण कोणतंही नातं हे एका क्षणात संपवू शकत नाही. रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप करण्याआधी आपण मनात अनेक प्रकारच्या गोष्टींची तयारी करत असतो. आपण नात्याबाबत मनातल्या मनात अनेक विचार करत असतो. 

टेनसी युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांचं म्हणनं आहे की, कोणतंही नातं संपवण्याआधी आपण त्याबाबत पूर्णपणे विचार करत असतो. ही ब्रेकअपची पहिली स्टेज असते. यात आपण आपल्या ब्रेकअपबाबत स्पष्ट नसतो आणि स्वत:ला यासाठी तयार करत असतो. 

त्यांनी सांगितलं की, जर तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत पूर्णपणे चिंतन केलेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की, नातं संपवणं हेच योग्य ठरेल तर या त्रासदायक नात्यात राहण्यापेक्षा ते संपवलेलं कधीही चांगलं. 

अभ्यासकांचं मत आहे की, ब्रेकअपची दुसरी स्टेज ही अवलोकन असते. तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये जे चिंतन केलेलं असतं, त्याचं तुम्ही अवलोकन करत असता. तुम्ही याबाबत विचार करता की, तुमचं रिलेशनशिप कुठे जात आहे? तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये वाढलेला दुरावा आणि हा दुरावा कसा कमी केला जाईल याचं अवलोकन करता, त्यानंतर निष्कर्षावर पोहोचता.

जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपचं अवलोकन केल्यानंतक या स्टेजवर पोहोचले असाल की,  ब्रेकअप करणेच ठीक आहे तर मन बदलू नका. कारण त्यानंतरही रिलेशनशिपमध्ये राहणं तुमच्यासाठी डोकेदुखीचं ठरू शकतं. त्यामुळे पुन्हा परत त्याच त्रास होत असलेल्या नात्यात जाणं टाळलं तरच तुम्ही शांततेने जगू शकाल.

Web Title: Relationship : If something troubling you again and again then break right way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.