Relationship : ​जर आपलेही असेल "एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर", तर या '५' गोष्टींची अवश्य घ्यावी काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 12:29 PM2017-10-01T12:29:01+5:302017-10-01T18:02:54+5:30

जर आपणही अशा एखाद्या नात्यात गुंतले असाल आणि आपण काहीही प्लॅनिंग केले नसेल तर ही काळजी घेतल्यास आपले नाते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात.

Relationship: If you have "Extra Marital Affair", then these '5' things must be worried! | Relationship : ​जर आपलेही असेल "एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर", तर या '५' गोष्टींची अवश्य घ्यावी काळजी !

Relationship : ​जर आपलेही असेल "एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर", तर या '५' गोष्टींची अवश्य घ्यावी काळजी !

Next
ong>-रवींद्र मोरे 
सध्याच्या काळात प्रेम आणि ब्रेकअप होणे सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या सभोवताली असा एखादा व्यक्ती नक्की असेल ज्याचा ब्रेकअप झाला असेल. प्रेमाचा विचार केला तर लहान मुलांच्या खेळासारखेच झाले आहे. सध्याच्या युगात प्रेम-समर्पण सारख्या गोष्टी अजिबात राहिल्या नाहीत. आपण असे खूपच कमी कपल्स पाहिले असतील की जे लग्नानंतर एकमेकांशी प्रामाणिक असतील. त्यामुळेच सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या बातम्या जास्त चर्चेत आहेत. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा अन्य कारणाने हे प्रकरणे वाढताना दिसत आहेत.   
 
बऱ्याचदा असे नाते तयारही मात्र काहीही नियोजन न करता सर्वकाही येणाऱ्या काळावर सोडले जाते. जर आपणही अशा एखाद्या नात्यात गुंतले असाल आणि आपण काहीही प्लॅनिंग केले नसेल तर आपण खालील काळजी घेतल्यास आपले नाते चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात.   

* या नात्यात येण्यापुर्वी अवश्य विचार करावा 
आपण अशा नात्यात का येऊ इच्छिता, याचेही काही कारण असेल. याव्यतिरिक्त आपण या गोष्टीचा अवश्य विचार करावा की, जेव्हा या गोष्टीबाबत तुमच्या पार्टनरला कळेल तेव्हा मात्र ती या गोष्टीचा अजिबात स्वीकार करु शकणार नाही. यामुळे आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. यासाठी अफेयर करण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करावा.  

* कमिटमेंट अजिबात करु नये  
जर आपण एखाद्या सोबत आपले नाते टाइमपास म्हणून तयार करत असाल तर आपण कधीही कोणत्याही प्रकारची कमिटमेंट करु नये. ही कमिटमेंट आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. आपण या नात्यात फक्त काही बेसिक गरजांसाठी आले आहात, त्यामुळे कमिटमेंट टाळाच.   

* भावनात्मक जवळीकता नको 
आपणास ही गोष्ट माहित असावी की, अशा प्रकारच्या नात्याला कोणतेही भविष्य नसते. म्हणजे हे नाते आपण लग्नापर्यंत घेऊनच जाऊ शकत नाही. यासाठी अगोदरपासून ठरवून घ्या की, आपल्या पार्टनरसोबत आपली भावनात्मक जवळीकता नकोच. बऱ्याचदा भावनाशील होऊन आपण बरेच इंटीमेंट फोटो क्लिक करुन सोशल मीडियावर शेअर करतात, मात्र नंतर आपल्या आनंदाला ग्रहण लागते.  

* वैवाहिक नाते संपुष्टात येऊ शकते 
एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यायची की, कोणतेही नाते निभविण्यासाठी दोघांना समजणे खूप गरजेचे असते. आपल्यामुळे लोकांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये ही काळजी तर घ्यावीच. जर आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमध्ये असाल तर आपले वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊन आपला पार्टनर आपल्यापासून कायमचा दूर होऊ शकतो. म्हणजेच आपले वैवाहिक नाते संपुष्टात येऊ शकते. यासाठी जे ही काही कराल विचारपूर्वकच करावे.  

* सुरक्षिततेही घ्यावी पूर्ण काळजी  
आपले हे नाते कुठपर्यंत न्यायचे आहे, हे आपल्यावर अवलंबुन असते. जर आपण हे नाते बेडरुमपर्यंत नेऊ इच्छिता तर भविष्यात आपल्याला कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून सुरक्षितता आणि हायजिनची पूर्ण काळजी घ्यावी.    
  

Web Title: Relationship: If you have "Extra Marital Affair", then these '5' things must be worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.