ब्रेकअपनंतर 50 टक्के लोकांना सतावते एक्सची आठवण, मग करतात 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 05:08 PM2018-07-03T17:08:57+5:302018-07-03T17:10:10+5:30
अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो तर काही लोक सहज यातून बाहेर पडतात. जे यातून बाहेर येऊ शकत नाहीत ते आपल्या एक्सकडे पुन्हा परत जाण्याचा विचार करतात.
प्रेमाच्या नात्यात सुरुवातील फारच सगळं छान छान वाटत असतं पण त्याच नात्यात काही काळाने अडचणी निर्माण होत असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं होतात. पण भांडण होणं हाही एक प्रेमाचाच भाग आहे. पण काही कपल्स हे या भांडणामुळे कशाचाही विचार न करता थेट ब्रेकअपचा मार्ग अवलंबतात. त्यानंतर अनेकांना फार त्रास सहन करावा लागतो. तर काही लोक सहज यातून बाहेर पडतात. जे यातून बाहेर येऊ शकत नाहीत ते आपल्या एक्सकडे पुन्हा परत जाण्याचा विचार करतात.
आंतरराष्ट्रीय स्तराच्या एका शोधानुसार 50 टक्के लोकांना ब्रेकअपनंतर आपल्या एक्सची फार आठवण येते. आणि या दरम्यान त्यांना आपल्या एक्ससोबत त्यांना पुन्हा पॅचअप करण्याचा विचार येतो. आश्चर्याची बाब म्हणजे तर ही आहे की, ब्रेकअपनंतर आपल्या एक्सकडे परत जाणाऱ्यांची संख्या ब्रेकअप करणाऱ्यांच्या बरोबरीत आहे. म्हणजे त्यांच्या मनात असे काही विचार येतात की, ते एक्सकडे परत जाण्यासाठी तयार असतात. चला जाणून घेऊया या शोधातील काही महत्वाचे मुद्दे...
शोधातून काय झाले खुलासे?
या अभ्यासामध्ये सहभागी लोकांनी ब्रेकअप करणे आणि नंतर एक्सकडे परत जाण्याची अनेक कारणे सांगितली. 27 कारणे एक्सकडे परत जाण्याची मिळाली तर 23 कारण असे होते ज्यात लोकांनी सांगितले की, ब्रेकअप करण्याचा निर्णय योग्य होता आणि त्यांना सिंगल राहणे पसंत आहे.
इमोशनल कनेक्शन
रिपोर्टनुसार, ब्रेकअप करण्याचं कारण कितीही कठोर असलं तरी काही काळाने लोक आपल्या एक्ससोबत घालवलेल्या इमोशनल गोष्टींचा विचार करतात आणि त्यांना आठवतात. हे इमोशनल कनेक्शन त्यांचं आपल्या एक्सकडे परत जाण्याचं सर्वात मोठं कारण आहे.
सिंगल राहण्याची भीती
बऱ्याचदा असं होतं की, ब्रेकअपनंतर बराचकाळ काही लोक सिंगल राहतात. यादरम्यान त्यांना ही भीती सतावत असते की, ते आयुष्यभर एकटेच राहतील. अशात त्यांना एक्सकडे परत जाण्याची संधी मिळली तर ते जातात.
एक अपेक्षा
गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप करण्याचं काही ना काही कारण असतं. पण काही काळाने त्यांना जेव्हा असं वाटतं की, एक्सच्या त्या चुकांमध्ये सुधारणा झाली आहे, तेव्हा ते पुन्हा एक्सकडे जातात.
ज्यांना परत जायचं नाहीये
अभ्यासादरम्यान 38 टक्के लोक असेही होते जे आपल्या एक्स पार्टनरची आठवण तर काढतात. पण चुकूनही त्यांना त्यांच्याकडे परत जायचं नाहीये. याची वेगवेगळी कारणे त्यांनी सांगितली त्यात पार्टनरकडून दगा मिळणे, कधीही न सोडवली जाणारी भांडणे इत्यादी गोष्टी होत्या.