उंच पुरुषांकडे जास्त का आकर्षित होतात महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:42 PM2018-07-17T17:42:52+5:302018-07-17T17:43:12+5:30
महिलांना उंच पुरूषकडे अधिक आकर्षित होतात असेही सांगण्यात आले आहे. जवळपास ५० टक्के महिला अशा पुरूषांना डेट करतात जे त्यांच्यापेत्रा उंच आहेत. चला जाणून घेऊया कारण....
साऊथ कोरियाच्या सियोल येथील कोनकुक विश्वविद्यालयाकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, ज्या जोडप्यांमध्ये उंचीबाबत विरोधाभास असतो ते जोडपे अधिक आनंदी जीवन जगतात. त्यासोबतच महिलांना उंच पुरूषकडे अधिक आकर्षित होतात असेही सांगण्यात आले आहे. जवळपास ५० टक्के महिला अशा पुरूषांना डेट करतात जे त्यांच्यापेत्रा उंच आहेत. चला जाणून घेऊया कारण....
ताकद - उंचीचा संबंधे थेट ताकदीशी जोडली जातो. महिलांनुसार जे पुरूष उंच असतात ते ताकदवान असतात आणि त्यांची ताकद शारीरिक ताकद मानसिक ताकदीलाही प्रभावित करते. म्हणजे उंच पुरूष ठेंगण्या पुरूषांच्या तुलनेत जास्त आत्मविश्वासू असतात. त्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात.
सुरक्षा - उंची महिलांना शारीरिक सुरक्षेचा विश्वास देते. पण कमी उंची असलेल्या पुरूषांबाबत महिलांना सुरक्षित वाटत नाही. याच कारणामुळे महिला अशा पुरूषांचा शोध घेतात जे उंच असतील.
प्रभुत्व - उंच पुरूष हे नेहमी दुसऱ्यांवर आपलं प्रभुत्व ठेवण्यात यशस्वी असतात. खरंतर हे त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे होतं. त्यामुळे इतरांवर त्यांचं प्रभुत्व राहतं. महिलांना त्यांच्यातील हीच गोष्ट आवडते.
फिटनेस - उंच पुरूष हे नेहमी फिट दिसतात. त्यामुळेही महिलांचं त्यांच्याप्रति आकर्षण अधिक बघायला मिळतं. अशा पुरूषांसोबत राहून महिलाही आपल्या फिटनेसबाबत जागरूक असतात.
लूक - उंच पुरूषांसोबत महिला कोणत्याही बंधनात नसतात. म्हणजे कमी उंचीच्या पुरूषांसोबत असताना काही महिलांना उंच हिल्स वापरता येत नाही. असे काही ड्रेसही असतात जे कमी उंचीच्या पुरूषांसोबत परिधान करता येत नाहीत. पण उंच पुरूषासोबत असं काही नसतं. त्यामुळे ही महिला उंच पुरूषांकडे अधिक आकर्षित होता.