तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:04 PM2023-07-24T17:04:03+5:302023-07-24T17:05:54+5:30

Relationship Tips : जर अशी स्थिती तुमच्या पार्टनरसोबत झाली असेल तर त्याच्यावर चिडणे ठीक असेल? कदाचित नाही. उलट या संधीचा वापर तुम्ही तुमच्यासाठी करुन घेऊ शकता.

Relationship : These are signs your boyfriend has crush your friend | तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध

तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Relationship Tips : तुम्ही कधीही बॉयफ्रेन्डला दगा देण्याचा विचारही केला नसेल. तरिही एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्टी तुम्हाला चांगली वाटू शकते. त्या व्यक्तीच्या एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे ती व्यक्ती तुमची खास होणं यातही काही गैर नाही. कारण ही सामान्य बाब आहे. जर अशी स्थिती तुमच्या पार्टनरसोबत झाली असेल तर त्याच्यावर चिडणे ठीक असेल? कदाचित नाही. उलट या संधीचा वापर तुम्ही तुमच्यासाठी करुन घेऊ शकता. तुम्हाला हे जाणून घेण्यास सोपं होईल की, तुमच्या मैत्रिणीची अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या बॉयफ्रेन्डला प्रभावित करत आहे. 

तेच दुसरीकडे तुम्ही हेही नोटीस करू शकता की, तुमच्या बॉयफ्रेन्डची मैत्रिणीसोबतची जवळीकता प्रमाणाबाहेर वाढत आहे तर तुम्ही सावध होऊ शकता. विषय हाताबाहेर जाण्याआधीच तुम्ही स्थिती नियंत्रित करू शकता. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला रोखण्यात असमर्थ ठरत असा ल तर हा संकेत आहे की, तुम्ही त्याला जाऊ द्यावं. अशाच काही गोष्टींच्या माध्यमातून जाणून घेऊ की, तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीबाबत किती सिरिअस आहे.

1) तिच्या उपस्थितीत तो सुपर बॉयफ्रेन्ड होतो का?

जर तो असं करत असेल तर याचे दोन अर्थ लावले जाऊ शकतात. पहिलं हे की, त्याला तुमच्या मैत्रिणीसोबत मैत्री करायची आहे आणि त्यासाठी तुमचा होकार हवाय. तो हे दाखवतोय की, तो तिच्यासोबतही चांगला व्यवहार करेल. दुसरं म्हणजे बॉयफ्रेन्ड तुमची फार काळजी घेऊन तुमच्या मैत्रिणीला हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की, तिने जर याला बॉयफ्रेन्ड म्हणून चान्स दिला तर ती त्याच्यासोबत खूश राहील. म्हणजे तिला इम्प्रेस करण्यासाठी तो सुपर बॉयफ्रेन्ड बनत असावा.

2) बाहेर गेल्यावर मैत्रिणीला बोलण्यास सांगतो

तुम्ही भलेही बॉयफ्रेन्डसोबत बाहेर डिनरला किंवा कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करता, अशात तुमचा बॉयफ्रेन्ड कसंही मॅनेज करून तुमच्या मैत्रिणीला विचारत असेल. यावरून समजून घ्या की, त्याला तुमच्यासोबत एकट्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या मैत्रिणीला बोलवण्यात का इतका इंटरेस्ट असेल. 

3) मैत्रिणीचे सोशल मीडियात अकाऊंट चेक करतो

तुमचा बॉयफ्रेन्ड जर तुमच्या मित्रांच्या सर्कलबाबत जाणून घेण्यासाठी मैत्रिणीचं सोशल मीडियात अकाऊंट चेक करत असेल तर ठीक आहे. पण तो जर केवळ तुमच्या एकाच मैत्रिणीच्या प्रोफाइलला जास्त वेळ देत असेल तर समजा तिच्यावर त्याचं क्रश आहे.  

4) तो अचानक तिचा बेस्ट फ्रेन्ड बनतो

केवळ एक मित्र होण्यात आणि फ्लर्ट करण्यात फरक असतो. तुमच्या बॉयफ्रेन्डच्या व्यवहाराचं निरिक्षण करून तुम्हाला हे ओळखावं लागेल की, तो केवळ नॉर्मल मैत्री करतोय की तिच्यावर ट्राय मारतोय. 

5) ती आजूबाजूला असली की, हसत राहतो

त्याच्या मनात जर काही खोट असेल तर तुमच्या हे लक्षात येईल की, तो तुमची मैत्रिण सोबत किंवा आजूबाजूला असल्यावर जरा जास्तच हसत असतो. तुमची मैत्रिण आजूबाजूला असल्यावर त्याला जास्त आनंद मिळतो. ही बाब तुमच्या रिलेशनशिपसाठी चांगली नाहीये. 

6) तुमच्या मैत्रिणीशी तो फोनवर बोलतो

जर तुमचा बॉयफ्रेन्ड आणि तुमची मैत्रिणी एकमेकांसोबत फोनवर बोलत असताना विषय तुमचा किंवा कोणताही सामान्य असेल तर चांगलं आहे. पण हे प्रमाण वाढलं असेल आणि विषय तुमचा नसेल तर हे योग्य नाहीये. 

7) मैत्रिण जाताना इमोशनल होतो

तुमचा बॉयफ्रेन्ड आणि तुम्ही मैत्रिणीसोबत वेळ घालवत असाल तोपर्यंत सगळं ठिक आहे. पण जेव्हा तुमची मैत्रीण जाते तेव्हा तुमच्या बॉयफ्रेन्डचा मूड खराब होत असेल तर हे योग्य नाही. किंवा तुमच्याशी चिडून बोलत असेल तर हेही योग्य नाही. हा संकेत आहे की, तुमच्या मैत्रिणीचं तिथं असणं तुमच्या बॉयफ्रेन्डवर किती आणि कसा प्रभाव टाकतं. 

Web Title: Relationship : These are signs your boyfriend has crush your friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.