ब्रेकअपच्या वेदना कमी करण्यासाठी काही खास टिप्स, नक्की होईल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:30 PM2023-09-19T17:30:32+5:302023-09-19T17:31:34+5:30
Relationship : यातून कधीना कधी बाहेर यावंच लागतं नाही तर जगणं कठीण होतं. त्यासाठी यातून बाहेर येण्याच्या काही टिप्स सांगत आहोत.
Relationship : ब्रेकअपचा हा काळ कुणासाठीही सोपा नसतो, कारण यातून डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं, मनाला न भरता येणाऱ्या अशा जखमा झालेल्या असतात. पण यातून कधीना कधी बाहेर यावंच लागतं नाही तर जगणं कठीण होतं. त्यासाठी यातून बाहेर येण्याच्या काही टिप्स सांगत आहोत.
सत्य स्विकारा
एक मोठ्ठा श्वास घ्या आणि जे सत्य आहे ते स्विकारा. आता तुमचं ब्रेकअप झालेलं आहे आणि पुन्हा वळून बघायचं नाहीये. सत्य स्विकारुन भावनांवर आवर घालणे तुम्हाला करावे लागेल. याने तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्याला सोपं होईल. हे तुम्ही केवळ एका दिवसात विसरु शकणार नाहीत. पण त्यामुळे स्वत:ला थोडा वेळ द्या, शांत व्हा आणि सकारात्मक विचार करा. यातून तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला तुम्ही भावनात्मक दृष्टीने फार स्ट्रॉंग झालेले बघाल.
ओव्हरथिंक करु नका
तुमच्या नात्यामध्ये काय घडलं, का घडलं याचा विचार करणे ही चांगली गोष्ट आहे. त्यातून तुम्ही शिकायला हवं. पण याची काळजी घ्या की, तुम्ही ओव्हरथिकींग करत नाही आाहात. सकारात्मक रहा आणि पुढचा विचार करा.
काहीतरी लिहून काढा
तुम्हाला वाटतं ते लिहून काढणं हे तुम्हाला रिलॅक्स करणारं ठरु शकतं. तुमच्या डोक्यात काय सुरु आहे ते जसच्या तसं लिहून काढा. दुसऱ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे हे तुमच्यासाठी जास्त फायदयाचं ठरेल.
तुमच्या जवळच्या लोकांशी बोला
तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत तुमच्या मनात काय सुरु आहे ते बोलू शकता. त्यांच्याकडून काही सल्ला घेऊ शकता. त्यांच्यासोबत वेळ घालवा. याने तुम्हाला सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करायला संधी मिळणार नाही.