प्रत्येक पत्नीला वाटतं की, आपल्या पतीमध्ये असाव्यात 'या' खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:20 PM2019-09-10T15:20:11+5:302019-09-10T15:25:52+5:30
प्रत्येक महिलेच्या आपल्या पार्टनरकडून काही अपेक्षा असतात. मग त्या लग्नाआधीच्या असो किंवा लग्नानंतरच्या. अनेकदा असं सांगण्यात येतं की, महिलांना नेहमी असं वाटत असतं की, त्यांचा पार्टनरने त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करावं, घरामध्ये त्याच्या बरोबरीचं स्थान तिला मिळावं किंवा तिच्यावर जीवापाड प्रेम करावं.
प्रत्येक महिलेच्या आपल्या पार्टनरकडून काही अपेक्षा असतात. मग त्या लग्नाआधीच्या असो किंवा लग्नानंतरच्या. अनेकदा असं सांगण्यात येतं की, महिलांना नेहमी असं वाटत असतं की, त्यांचा पार्टनरने त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करावं, घरामध्ये त्याच्या बरोबरीचं स्थान तिला मिळावं किंवा तिच्यावर जीवापाड प्रेम करावं. परंतु, या अपेक्षांसोबतच महिलांच्या इतरही अनेक अपेक्षा असतात. जाणून घेऊया त्याबाबत...
अनेकदा पुरूषांना असं वाटतं की, महिलांना खूश ठेवणं अत्यंत अवघड काम असतं. परंतु हा कदाचित गैरमज असू शकतो. पत्नीला खूश करण्यासाठी प्रत्येकवेळी गिफ्ट द्यावचं लागेल असं नाही. असं सांगितलं जातं की, प्रेमाने दिलेली कोणतीही गोष्ट त्यांना आवडते.
असं सांगितलं जातं की, महिला तुमचे पैसे, महागडे गिफ्ट्स आणि गाडी यांमुळे खूश होत नाही. अनेक गोष्टी आहेत, ज्या महिलांना खूश करण्यासाठी उपयोगी ठरतील. परंतु, पुरूष त्यांच्या अपेक्षा किंवा इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्याची अपेक्षा प्रत्येक महिला आपल्या पार्टनरकडून करत असते. जाणून घेऊया महिलांच्या नक्की अपेक्षा काय असतात त्याबाबत...
पार्टनरच्या रूपात खरा मित्र
प्रत्येक महिलेची इच्छा असते की, तिचा पार्टनर तिचा सर्वात चांगला मित्र असावा. जेव्हा एकादी मुलगी आपलं घर सोडून सासरी जाते. त्यावेळी ती आपल्या पार्टनरवरच विश्वास ठेवू शकते. तुमच्यासोबत मनातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकते. परंतु, जर तुम्ही नातं मैत्रीमध्ये रूपांतरित केलं तर अनेक गोष्टी सोप्या होण्यास मदत होईल.
मनातील गोष्ट जाणून घ्या
सध्याच्या युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. परंतु पुरूषांच्या मनात अनेकदा घरातील कामं करताना शंका असतात. काही पुरूष खरचं समजूतदार असतात. ते आपल्या पार्टनरसोबत सर्व कामं मिळून करतात. पण अनेक पुरूषांना असं करणं चुकीचं वाटतं. पण सर्वात आधी एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की, गोष्ट कोणत्याही हक्काची किंवा समानतेची नाही. तर गोष्ट आहे प्रेम, इच्छा आणि फिलिंग्सची. महिलांची इच्छा एवढीच असते की आपल्या पार्टनरने आपल्याला समजून घ्यावं.
पार्टनरने काळजी घ्यावी...
असं सांगितलं जातं की, प्रत्येक महिलेची अशी इच्छा असते की, आपला पार्टनर केअरिंग असावा आणि त्याने आपली काळजी घ्यावी. तसेच त्यांच्या इच्छांची पूर्तता करावी. यामध्ये त्यांना काही जमत नाही असा नसतो तर त्यांना आपल्या पार्टनरकडून एका चांगल्या आणि मैत्रिच्या नात्याची अपेक्षा असते.
प्रेम व्यक्त करणंही आवश्यक
सुरुवातूपासूनच असं दिसून येत आहे की, पुरूष काम करतात आणि घर चालवतात, तर महिला घर सांभाळतात. पण आता वेळ बदलली आहे. आता महिला ऑफिससोबतच घरही सांभाळतात. पुरूष महिलांच्या मेहनीचं कौतुक करतात पण अनेकदा प्रेम व्यक्त करणं त्यांच्याकडून राहून जातं. अशातच आपलं प्रेम व्यक्त करणं नात्यामध्ये अत्यंत आवश्यक ठरतं.
कठिण परिस्थितीमध्ये एकमेकांची साथ
कठिण परिस्थितीमध्ये कोणत्याही नात्यामध्ये दोघांनीही एकमेकांना आधार देण्याची गरज असते. असं सांगितलं जातं की, प्रत्येक महिलेला कठिण परिस्थितीमध्ये आपला जोडीदार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहावा असं वाटत असतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)