रागाच्या भरात नातं नेहमीसाठी संपवण्याआधी एकदा स्वत:ला विचारा हे 3 प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:16 PM2023-08-04T17:16:28+5:302023-08-04T17:16:39+5:30

Relationship Tips : काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याल कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारले पाहिजे. 

Relationship Tips : Ask yourself these 3 question before ending your relationship | रागाच्या भरात नातं नेहमीसाठी संपवण्याआधी एकदा स्वत:ला विचारा हे 3 प्रश्न!

रागाच्या भरात नातं नेहमीसाठी संपवण्याआधी एकदा स्वत:ला विचारा हे 3 प्रश्न!

googlenewsNext

Relationship Tips : दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे आचार-विचार वेगवेगळे असतात. त्यांचे स्वभाव, आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात. काहींचा स्वभाव असा असतो ते मुद्दामहून काही मुद्दा काढून भांडत राहतात. तर काही कपल्स हे खूप समजूदार असतात. ते संवादाने समस्या दूर करतात. काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याल कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारले पाहिजे. 

1) तुम्ही दु:खी आणि रागात आहात का?

जेव्हा दोन लोक सोबत असतात तेव्हा वाद-भांडणं ही होणं एक स्वाभाविक बाब आहे. अनेकदा रागाच्या भरात लोक असं काही बोलून जातात ज्याचा त्यांना नंतर पश्ताताप होतो. अशावेळी रागाच्या भरात केलेल्या गोष्टींमुळे अनेक वर्षांचं नातं एकाएकी तोडणं कधीही शहाणपणाचं ठरणार नाही. आधी शांत व्हा, ती वेळ निघून जाऊ द्या. शांतपणे नात्याचा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. याचा विचार करा कि, तुम्हाला खरंच नातं संपवायचंय की, रागात तुम्ही बोलून गेलात. कारण रागाच्या भरात एकदा घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. 

2) हे नातं सांभाळून घेण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय का?

काही कारणांनी ठराविक वेळी नातं तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्ही हे नातं वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत का? जर तुम्हाला वाटत असेल की, हे नातं टिकवण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि आता करण्यासाठी काहीही राहिलं नाही तर तुम्ही मोकळे आहात. पण मनात हे नातं वाचवण्यासाठीची एकही शक्यता दिसत असेल तर ते करुन बघा. विषय सहज सोडून देऊ नका.

3) तुमच्या पार्टनरला नातं टिकवायचं आहे का?

कोणतही नातं हे एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतं. एक जरी चाक मोडलं गेलं तर गाडी पुढे जाणार नाही. दोघांमुळेच नातं तयार होत असतं. कदाचित तुम्ही शांत झाल्यावर दोघांमध्ये असलेली समस्या तुम्हाला सोडवायची असेल पण विचार करत असाल की, अनेक अडचणी आहेत. अशात जर तुमच्या पार्टनरलाही हे नातं टिकवायचं असेल तर ही एक नवी संधी समजा. दोघेही या संधीचा वापर तुमच्या नात्याचं भविष्य ठरवण्यासाठी करा. एकमेकांनी हे नातं का टिकवावं याचं निदान एक योग्य कारण द्या. 

Web Title: Relationship Tips : Ask yourself these 3 question before ending your relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.