पत्नीला खूश करणारे असे काही शब्द, पुरूषांनी एकदा ट्राय कराच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:11 PM2023-06-29T14:11:43+5:302023-06-29T14:12:14+5:30

Relationship Tips : धावपळीच्या जीवनात दोघांना वेगवेगळ्या तणावाचा सामना करावा लागतो. अशात पुरूषांनी हे लक्षात घ्यायला हवं की, दोन शब्द प्रेमाचे देखील पत्नीला बराच आनंद देऊन जातात.

Relationship Tips : Every wife wants hear these things from husband | पत्नीला खूश करणारे असे काही शब्द, पुरूषांनी एकदा ट्राय कराच!

पत्नीला खूश करणारे असे काही शब्द, पुरूषांनी एकदा ट्राय कराच!

googlenewsNext

Relationship Tips : लग्न म्हटलं की, दोन वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात आणि आयुष्याला नवी सुरूवात करतात. यात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी नव्याने शिकायच्या असतात. तडजोड करायची असते आणि एकमेकांना समजून घ्यायचं असतं. कुणीही एकतर्फी भूमिका घेतली की, नात्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टींमुळे दोघांमध्ये वाद होऊ शकतात तर काही अशाही गोष्टी असतात ज्यामुळे पत्नी आपला राग विसरून पतीसोबतचं नातं अधिक घट्ट करू शकते. धावपळीच्या जीवनात दोघांना वेगवेगळ्या तणावाचा सामना करावा लागतो. अशात पुरूषांनी हे लक्षात घ्यायला हवं की, दोन शब्द प्रेमाचे देखील पत्नीला बराच आनंद देऊन जातात.

मी सगळं ठीक करेन

माणसाकडून कधी काय चूक होईल सांगता येत नाही. अशात रोजची कामे करताना पत्नीकडून एखादी चूक झाली तर पती सवयीनुसार सामान्यपणे तिच्यावर रागावतात. पण रागावण्याऐवजी एकदा प्रेमाने तिला असं बोलून बघा की, जाऊदे....काही हरकत नाही....त्यात इतकं काही नाही. काळजी करू नको. मी सगळं ठीक करेन. इतके जरी शब्द वापरले तर पत्नीच्या मनात तुमच्या विषयी आणखी प्रेम आणि सन्मान वाढेल.

पोहोचली की फोन कर...

जर तुमची पत्नी एकटी माहेरी किंवा एखाद्या गावाला किंवा ऑफिसच्या कामासाठी कुठे जाणार असेल तर त्यांना फक्त इतकं म्हणा की, पोहोचल्यावर आठवणीने फोन कर. याने त्याना जाणीव होईल की, तुम्हाला त्यांची काळजी आहे. असं बोलल्याने तुमच्या पार्टनरला चांगलं वाटेल आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी आणखी प्रेम वाढेल.

मग आज काय विशेष...

प्रत्येकवेळी तिनेच तुमच्या दिवसभरातील गोष्टींची विचारपुस करावी, हा काही नियम नाही. कधी कधी वेळ काढून तुम्ही सुद्धा तिला त्यांचा दिवसा कसा गेला हे विचारू शकता. तसंच ती जे सांगत आहेत, ते कान देऊन ऐका. त्यांना हे चांगलं वाटेल.

तू आज आराम कर...मी काम करतो

आजच्या धावपळीच्या जीवनात महिला घरात आणि बाहेरील कामांमध्ये चांगला बॅलन्स ठेवतात. तर अनेकदा त्यांना खूप काम असेल तर तुम्हीही त्यांची मदत करू शकता. सुट्टीच्या दिवशी किंवा ऑफिसमधून आल्यावर टीव्हीसमोर रिमोट घेऊन बसण्याऐवजी तुम्ही कधी कधी पत्नीला तिला घरातील कामात मदत तर करूच शकता. असं म्हणाल तर तुमची पार्टनर नक्कीच खूश होईल. त्यांना याचा आनंद वाटेल की, तुम्हाला त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत जाणीव आहे आणि सोबतच मदतीसाठीही तयार आहात. 

आज बाहेरून मागवू...

बऱ्याच ऑफिसमधून थकून-भागून आल्यावर किंवा दिवसभर घरातील कामे केल्यावर पत्नी चांगलीच थकलेली असते. अशात त्याना सायंकाळी पुन्हा स्वयंपाकाचं टेंशन असतं. त्यात मुलांचा अभ्यास. अशात त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून आज बाहेरून काहीतरी मागवू असं म्हणाल तर नक्कीच पत्नीला आनंद होईल. याने तुमची त्यांच्याबाबतची काळजी दिसून येईल. 

Web Title: Relationship Tips : Every wife wants hear these things from husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.