सुंदर तरूणीला बघून भीती वाटते? मग तुम्ही या आजाराचे असू शकता शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:25 AM2023-07-07T10:25:26+5:302023-07-07T10:35:53+5:30

Relationship Tips : ही समस्या आहे आणि याकडे लोक फारच सामान्यपणे बघतात. म्हणजे याकडे लोक दुर्लक्ष करतात. अनेकदा अशा भीती सीमा पार करतात आणि आपल्यावर ताबा मिळवते. हीच स्थिती पुढे फोबियाचं रूप घेते.

Relationship Tips : Gynophobia meaning beautiful women phobia or caligynephobia venustraphobia | सुंदर तरूणीला बघून भीती वाटते? मग तुम्ही या आजाराचे असू शकता शिकार

सुंदर तरूणीला बघून भीती वाटते? मग तुम्ही या आजाराचे असू शकता शिकार

googlenewsNext

Relationship Tips : काही लोकांना काही गोष्टींची खूप भीती असते. त्याला फोबिया असं म्हटलं जातं. फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत मनात भिती असणे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटू शकते. काही लोकांना पाण्याची भीती असते, तर काही लोकांना उंची किंवा काही लोकांना पाल-झुरळाची भीती वाटते. 

ही समस्या आहे आणि याकडे लोक फारच सामान्यपणे बघतात. म्हणजे याकडे लोक दुर्लक्ष करतात. अनेकदा अशा भीती सीमा पार करतात आणि आपल्यावर ताबा मिळवते. हीच स्थिती पुढे फोबियाचं रूप घेते. काही लोकांना सुंदर तरूणीला बघून भीती वाटते. सुंदर तरूणी पाहून त्यांचा थरकाप उडतो किंवा ते घामाघुम होतात. चला जाणून घेऊ या अनोख्या फोबियाबाबत....

जास्तीत जास्त पुरूषांना सुंदर महिला पसंत असतात. पण काही असेही असतात ज्यांची सुंदर महिलांकडे बघण्याच्या किंवा त्यांच्यासोबत एकट्यात बोलण्याच्या विचारानेच हालत खराब होते. या फोबियाला कॅलिगनीफोबिया किंवा वीन्सट्राफोबिया असं म्हटलं जातं. या फोबियाने पीडित लोकांना सुंदर महिलांची इतकी भिती वाटते की, ते सुंदर महिलांना भेटण्याच्या किंवा बोलण्याच्या विचाराने अस्वस्थ होतात. 

काय असतात लक्षणे?

भीतीने थरकाप उडणे, श्वासांचा त्रास, हृदयाचे ठोके वाढणे आणि पाय लटपटणे, पोटात गोळा येणे, मळमळ होणे, डोकेदुखी, श्वास घेताना धाप लागणे, घुसमटल्यासारखे होणे, अचानक रडायला येणे किंवा ओरडणे.

भावनात्मक लक्षणे

कुठेतरी दूर पळून जावं वाटणे, मनात सतत जीव देण्याचा विचार येणे, आपला जीव गेलाय किंवा तुम्ही आंधळे झाला असं वाटणे, स्ट्रोक आल्यासारखं वाटणे तसेच कधी कधी वेड्यासारखं वाटणे किंवा स्वत:वर विचारांवर कंट्रोल नसणे.

हा आजार एक मानसिक समस्या आहे. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. वरील लक्षणे दिसत असतील तर वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि काही थेरपीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

Web Title: Relationship Tips : Gynophobia meaning beautiful women phobia or caligynephobia venustraphobia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.