पतीचं पत्नीसमोर रडणं ठीक आहे की नाही? वाचा सर्वेत काय म्हणाले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:09 PM2023-11-21T12:09:38+5:302023-11-21T12:12:54+5:30

Relationship Tips : विषय जेव्हा पत्नीचा येतो तेव्हा तर पती स्वत:ला अजिबात कमजोर दाखवत नाही. कारण पुरूष हा कुटुंबाचा प्रमुख असतो.

Relationship Tips : Is it okay for a husband to cry in front of his wife | पतीचं पत्नीसमोर रडणं ठीक आहे की नाही? वाचा सर्वेत काय म्हणाले लोक!

पतीचं पत्नीसमोर रडणं ठीक आहे की नाही? वाचा सर्वेत काय म्हणाले लोक!

Relationship Tips : मर्द को दर्द नहीं होता... मर्द रोते नहीं...असे कितीतरी डायलॉग्स सिनेमांमधून ऐकायला मिळतात. सिनेमात त्यांचं व्यक्तीमत्वही कमजोर दाखवलं जात नाही. खासकरून भावना व्यक्त करण्याबाबत. खऱ्या आयुष्यातही पुरूष आपल्या भावना मोजून-मापून व्यक्त करतात. विषय जेव्हा पत्नीचा येतो तेव्हा तर पती स्वत:ला अजिबात कमजोर दाखवत नाही. कारण पुरूष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. 

भलेही पुरूषांना कळत-नकळत असेच संस्कार मिळतात की, त्यांनी खासकरून महिलांसमोर आपले रॉ-इमोशन्स दाखवू नये. पण हेही तितकंच खरं आहे की, ते सगळ्यात जास्त सहज आपल्या जोडीदारासोबतच असतात.

sirc.org च्या एका रिसर्चमध्ये झालेल्या सर्वेत 73% पुरूषांना हे मान्य केलं होतं की, इमोशनल झाल्यावर ते आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंडसमोर रडण्यास कचरणार नाहीत. तेच 8 टक्के लोक म्हणाले की, ते कधी त्यांच्या जोडीदारासमोर रडणार नाहीत.

असं का?

पुरूष इतर पुरूषांसमोर कमी रडतात. याचं एक मोठं कारण म्हणजे एकमेकांसमोर स्वत:ला मजबूत असल्याचं दाखवणं आहे. तेच पत्नी किंवा गर्लफ्रेंडसमोर त्यांच्यात अशाप्रकारची भावना कमी असते. सोबतच त्यांना हेही चांगलं समजतं की, इमोशन्स समजून घेण्यात महिला जास्त सक्षम असतात.

Web Title: Relationship Tips : Is it okay for a husband to cry in front of his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.