कसं ओळखाल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल आहात की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:02 AM2019-10-31T11:02:28+5:302019-10-31T11:04:42+5:30

रिलेशनशिप असो वा लग्नाचं नातं. अनेकदा असं वाटतं की, आपला पार्टनरच आपल्याकडे लक्ष नाही किंवा त्याचं आपल्यावर प्रेमच नाही. अशातच आपल्या डोक्यात अनेक विचित्र विचार येण्यास सुरुवात होते.

Relationship tips in Marathi 5 important things for happy marriage life | कसं ओळखाल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल आहात की नाही?

कसं ओळखाल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल आहात की नाही?

Next

रिलेशनशिप असो वा लग्नाचं नातं. अनेकदा असं वाटतं की, आपला पार्टनरच आपल्याकडे लक्ष नाही किंवा त्याचं आपल्यावर प्रेमच नाही. अशातच आपल्या डोक्यात अनेक विचित्र विचार येण्यास सुरुवात होते. कदाचित तुम्ही विचार करत असलेल्या गोष्टी खऱ्या असू शकतात किंवा तो तुमचा गैरसमज असू शकतो. जर तुमच्या मनात तुमच्या पार्टनरबाबत शंका निर्माण होत असेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही. तर त्यासाठी आज आम्ही काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातील गैरसमज दूर करू शकता. 

मनातील गोष्टी जाणून घेणं... 

आपल्यापैकी प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, आपल्या पार्टनरने आपल्या सर्व गोष्टी किंवा प्रॉब्लेम्स आपण न सांगताच जाणून घ्यावे. म्हणजेच, त्याने आपल्या मनातील गोष्टी ओळखाव्यात. जर तुमचा पार्टनर तुम्हाला स्पेशल समजत असेल तर तुम्हाला काय म्हणायचंय ते तो लगेच समजू शकतो. 

तुमच्या गोष्टींवर लक्ष देणं

सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये एकमेकांसाठी वेळ काढणं अत्यंत अवघड आहे. अशातच जर बिझी राहण्याव्यतिरिक्त तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टी ऐकण्यासाठी वेळ काढत असेल तर समजून जा की, तुम्ही त्यांच्यासाठी फार खास आहात. 

गिफ्ट्स देणं 

जर तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल असाल तर तुम्हाला खूश करण्यासाठी तो छोटे-छोटे सरप्राइज प्लॅन नक्की करेल. कधी सरप्राइज डिनर किंवा एखादं स्पेशल गिफ्ट तो तुम्हाला नक्की देईल. तो आपल्या कामात कितीही बिझी असला तरिही तुम्हाला वेळ देण्यासाठी तो काहीना काही उपाय नक्की शोधेल. 

प्रत्येक गोष्टीत सहमत असणं 

अनेक लोकांची अशी इच्छा असते की, आपला लाइफ पार्टनर प्रत्येक गोष्टीत आपल्याशी सहमत असावा. तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही अत्यंत चुकीचा विचार करताय. कारण जो तुमचा खरा लाइफ पार्टनर असेल तो तुमच्या चुकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळीच सावध करेल. प्रसंगी तुमच्यावर रागवेलही पण तुम्हाला योग्य सल्ला देईल. 

प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंदी होणं 

प्रत्येक वेळी गरजेचं नाही की, पार्टनरला खूश करण्यासाठी नेहमी काही मोठ्या गोष्टीच कराव्या. जर तुमचा पार्टनर छोट्या गोष्टींवरूनही खूश होत असेल तर समजून जा की, तुम्ही त्यांच्यासाठी फार खास आहात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Web Title: Relationship tips in Marathi 5 important things for happy marriage life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.