कोरोनामुळे कपल्समध्ये वाढताहेत ब्रेकअप अन् घटस्फोटाच्या घटना; तज्ज्ञांची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 05:08 PM2020-12-13T17:08:49+5:302020-12-13T17:17:26+5:30

Relationship Tips in Marathi :  कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरात ब्रेकअप आणि घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत.

Relationship Tips: Pandemic spikes break ups divorces research | कोरोनामुळे कपल्समध्ये वाढताहेत ब्रेकअप अन् घटस्फोटाच्या घटना; तज्ज्ञांची धोक्याची सुचना

कोरोनामुळे कपल्समध्ये वाढताहेत ब्रेकअप अन् घटस्फोटाच्या घटना; तज्ज्ञांची धोक्याची सुचना

Next

कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरातील लोकांच्या जीवनात मोठा परिणाम घडून आला आहे. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मनावर परिणाम झालेला दिसून आला. यामुळे अनेक घरांमध्ये नात्यांमध्ये दुरावा आल्याचे तुम्ही पाहिले असेल.  कोरोनाच्या माहामारीमुळे जगभरात ब्रेकअप आणि घटस्फोटाची प्रकरणं वाढत आहेत. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे ब्रेकअप होण्याच्या घटना अजूनही वाढू शकतात. कारण  कोरोनाचा उद्रेक पुन्हा झाला तर पुन्हा अशी स्थिती उद्भवू शकते. 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार इंग्लँडमध्ये राहत असलेल्या २९ वर्षीय महिला सोफी टर्नर आणि त्यांचे पती घटस्फोट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या आधीपासून य दोघांच्या वेगळं होण्याच्या चर्चा होत्या. पण माहामरीमुळे सोफी या ताण तणावाखाली असल्यामुळे त्यांचे लग्न तुटले. ब्रिटनमधील  कायद्यांचा अभ्यास करत असलेल्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑक्टोबरमध्ये घटस्फोटाशी संबंधीत घटनांमध्ये १२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Breakup

चॅरिटी सिटीजेन एडवाईज या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लोक नातं तोडण्यासाठी ऑनलाईन सल्ला शोधत आहेत. या प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अमेरिकेच्या एका लॉ फर्मचे म्हणणे आहे की घटस्फोटाच्या प्रकरणात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनामुळे घटस्फोटाच्या घटना चीनमध्येही पाहायला मिळाल्या आहेत. तर स्वीडनमध्येही अशीच परिस्थिती आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की कोरोनामुळे बर्‍याच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि लोक मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. या कारणांमुळे ब्रेकअपची प्रकरणे वाढली आहेत. 'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना आपलं राहणीमान बदलावं लागेल. लॉ फर्ममध्ये कार्यरत असलेल्या कार्ली किंच यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या या साथीने जोडप्यांमध्ये प्रचंड समस्या आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे जोडप्यांना एकत्र जास्त वेळ घालवावा लागतो आणि हे अनेक जोडप्यांसाठी नुकसानकारक ठरलं आहे. ....म्हणून साखरपुड्याची अंगठी नेहमी डाव्या हातातील अनामिकेत घालतात

Web Title: Relationship Tips: Pandemic spikes break ups divorces research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.