एकटेपणा घालवण्याचा अनोखा फंडा, भाड्याने मिळवा फॅमिली अन् काही दिवस सोबत रहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 05:21 PM2023-09-14T17:21:36+5:302023-09-14T17:22:01+5:30

Relationship : यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचा परिवारच नाही. तर काही लोकांच्या परिवारातील लोकांचे सदस्य सोबत राहत नाहीत.

Relationship : To overcome loneliness Japanese people rent friends and family | एकटेपणा घालवण्याचा अनोखा फंडा, भाड्याने मिळवा फॅमिली अन् काही दिवस सोबत रहा!

एकटेपणा घालवण्याचा अनोखा फंडा, भाड्याने मिळवा फॅमिली अन् काही दिवस सोबत रहा!

googlenewsNext

Relationship : जपानी लोकांनी एकटेपणा दूर करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. जपानमध्ये लोक मित्रांना आणि परिवारांना घरी काही वेळ घालवण्यासाठी ऑफर देत आहेत. इतकेच नाही तर जपानी लोक एका वेळचं जेवण देण्याचीही ऑफर देत आहेत. काही लोकांनी तर यासाठी जाहिरातही दिली आहे. यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांचा परिवारच नाही. तर काही लोकांच्या परिवारातील लोकांचे सदस्य सोबत राहत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारच्या सर्व्हिसचा ट्रेन्ड वाढत आहे.

2010 वर्षांआधी झाली होती सुरूवात

या ट्रेन्डची सुरूवात 2010 मध्ये जपानची कंपनी फॅमिली रोमान्सने केली होती. ही एकप्रकारची रेंटल सर्व्हिस आहे. कंपनीच्या मदतीने जपानच्या काजुशीग निशिदाने त्यांच्या जेवण करायला येण्यासाठी दोन लोकांसाठी जाहिरात दिली होती. निशिदा यांचं म्हणणं आहे की, ही जाहिरात एक महिला आणि तिच्या मुलीसाठी देण्यासाठी देण्यात आली होती. यानुसार एक दिवसासाठी कोणताही महिला आणि तिची मुलगी इथे राहू शकत होते.

निशिदा सांगतात की, माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि मुलगी तिच्या घरी राहते. जेव्हा पत्नी आणि मुलीच्या रूममध्ये भाडेकरू येतात तेव्हा मला वाटतं की, ते माझा परिवार आहेत. अशाप्रकारे एकटेपणा दूर होतो. निशिदा यांना अशाप्रकारच्या सर्व्हिसची माहिती टीव्हीवर मिळाली होती. निशिदा यांनी गेल्या दोन वर्षांपासून 9 वेळा ही सर्व्हिस दिली आहे. यासाठी एका व्यक्तीला एका दिवसासाठी 14 हजार रूपये द्यावे लागतील. 

रोमान्स फॅमिलीचे सीईओ यूइची इशी सांगतात की, 'ही संकल्पना मला तेव्हा सुचली जेव्हा मी 24 वर्षांचा होतो. माझा एक मित्र आणि त्याची पत्नी वेगळे राहत होते. त्याच्या पत्नीला मुलाचं अ‍ॅडमिशन किंडरगार्टेनमध्ये करायचं होतं. पण सिंगल आई असल्याने अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज फेटाळला. त्यामुळे मी कंपनी सुरू केली'.

यूइची यांच्यानुसार, कंपनीच्या मदतीने काही वेळेसाठी किंवा काही दिवसांसाठी भाड्याने फॅमिली किंवा मित्रांची साथ मिळवली जाऊ शकते. वर्तमानात कंपनीकडे 250 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व्हिसमधील 98 टक्के लोकांनी याला चांगलं म्हटलं आहे.

Web Title: Relationship : To overcome loneliness Japanese people rent friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.