प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:01 PM2020-01-05T12:01:34+5:302020-01-05T12:01:50+5:30
दैनंदिन जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि त्याच्या प्रेमात वेडं होणं या गोष्टी वारंवार घडत असतात.
(image credit-merriam-webster.com)
दैनंदिन जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि त्याच्या प्रेमात वेडं होणं या गोष्टी वारंवार घडत असतात. पण सगळ्यात कठिण असतं ते म्हणजे नातं टिकवणं कारण प्रेम करणं प्रेम आणि नातं टिकवण्याच्या तुलनेत सोपं असतं. जर प्रेमात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे समाधान मिळतं नसेल किंवा कंटाळा येत असेल तर हे नातं कधीही तुटू शकतं. पण काही राशींचे पार्टनर हे नातं तोडण्यात नेहमी यशस्वी होतात. त्यामुळे त्यांचा पार्टनरला मानसीक त्रास सुद्दा सहन करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुलींकडून तुम्हाला नात्यात धोका मिळण्यची शक्यता आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या मुली या स्वभावाने चांगल्या असतात. पण पार्टनरने त्यांच्याशी जर काही चुकीचा प्रकार केला किंवा त्यांच्या मनाविरूध्द काही केले तर त्या पार्टनरला माफ करत नाहित. अशा परिस्थितीत या राशीच्या मुली पार्टनरची साथ सोडून वेगळे होऊ शकतात.
मिथुन
मिथुन राशीच्या मुली पार्टनरच्या बाबतीत जास्त भावनीक नसतात. त्यांना पार्टनरच्या चुकीच्या वागण्याचा फारसा फरक पडत नसतो. त्यांच्या वागण्यातून त्या पार्टनरला दुखावू शकतात. पार्टनरला काय वाटतं या गोष्टीला कमी महत्व देतात.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोकं रागीष्ट असतात. पण या कारणामुळे त्या आपल्या पार्टनरपासून दूर जाऊ शकतात. त्यांच्या रागावर ताबा मिळवणे कठिण असते त्यामळे नात्यावर या रागाचा परिणाम होऊन नातं तुटू सुद्धा शकतं.
मीन
मीन राशीचे लोक खूप कोड्यात असल्यासारखं जीवन जगत असतात. त्यांना ओळखणं फार कठिण होऊन बसतं. शांत राहणं पसंत करतात. जर त्यांना रिलेशनशीपमध्ये असताना स्वातंत्र्य किंवा आनंद मिळाला नाही तर त्या आपल्या पार्टनरपासून दूर जाऊ शकतात. अर्थात या राशीच्या मुली आपल्या पार्टनरची निवड करताना खूप विचार करून करतात.
सिंह
या राशीच्या लोकांपासून जरा सांभाळून राहणेच फायद्याचे ठरेल कारण त्यांना स्वतःचा आनंद जास्त प्रिय असतो. जर पार्टनर कडून गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर त्या पार्टनरला कोणत्याही क्षणी सोडून जाऊ शकतात.
मकर
मकर राशीच्या मुली या परिस्थीतीनुसार वागत असतात. तसंच जर पार्टनरच्या वागण्यातून त्यांना दुःख होत असेल तर त्या कोणत्याही क्षणी नातं तोडू शकतात. तसंच त्यांना राग आल्यास तो दूर करणं कठीण होऊन बसतं.