समोरच्याकडून प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करायला हवं? जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:54 PM2023-08-16T16:54:57+5:302023-08-16T16:55:47+5:30
Relationship : जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते.
Relationship : एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत आनंदाने जीवन जगायचं असतं, पण तोच उत्साह तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्यवहारातून दिसत नसतो. हे तर सर्वांनाच माहीत असतं की, रिलेशनशिप यशस्वी ठेवण्यासाठी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते.
असंही झालं असेल की, तुम्ही स्वत: त्या स्थितीमध्ये पोहोचले असाल. तुम्ही तुमचा सगळा वेळ केवळ तुमच्या पार्टनरला दिली असेल. पण तसं समोरून झालं नसेल तर तुम्हाला स्वत: विचित्र अडचणीत अडकल्यासारखं वाटतं. अशात हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
जर तुम्ही अशाच काहीशा स्थितीचा सामना करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यात सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, काय खरंच तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नकोसे झाले आहात? अशात काय करता येऊ शकतं हे जाणून घेऊ.
अशात काय करावं?
अशी परिस्थिती जर समोर असेल तर तुम्ही परिस्थितीला मान्य केल्याशिवाय काही करू शकत नाही. तुम्हाला हे समजून यायला हवं की, तुम्हाला हवं असलेलं प्रेम हे नाही. जेव्हा समोरून याचा खुलासा होईल त्यावेळी अधिकच वाईट वाटेल आणि दु:ख होईल. दोन्हीकडून त्रास तुम्हालाच होणार आहे.
स्वत:ला माफ करा
सर्वातआधी तर या नात्यात येण्यासाठी स्वत:ला माफ करा. या रिलेशनमधून बाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करा. घाई अजिबात करू नका. यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या.
एकट्याने हे ओझं सहन करणं टाळा
तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, हे ते साधं ओझं नाहीये जे तुम्ही एकट्याने सहन करू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची मदत घेऊ शकता. तसेच हे नातं यशस्वी झालं नाही म्हणजे तुम्ही पुन्हा प्रेम करू शकत नाही किंवा तुम्हाला कुणी प्रेम करणारं मिळणार नाही असं नाहीये. आयुष्याच्या वळणांवर तुम्हालाही प्रेम मिळेल.
दुरावा ठेवा
पार्टनरसोबत दुरावा ठेवायला सुरूवात करा. तुम्ही पार्टनरपासून दूर गेल्याशिवाय यातून बाहेर पडूच शकत नाही. जर तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर जबरदस्तीने स्वत:ला लादू शकत नाही.
प्रेमावर ठेवा विश्वास
एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही हार मानू नये. प्रेमाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. त्यानेच तुमचा त्रास कमी होईल. प्रेमावरील विश्वास उडू देऊ नका.