का कुणी आयुष्यभर त्यांच पहिलं प्रेम विसरू शकत नसतं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:55 PM2023-07-11T16:55:46+5:302023-07-11T16:56:55+5:30

Relationship Tips : असं कोणतं कारण असतं ज्यामुळे कुणीही आयुष्यभर त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. चला जाणून घेऊ कारण...

Relationship : Why we not forget our first love know main reasons | का कुणी आयुष्यभर त्यांच पहिलं प्रेम विसरू शकत नसतं? जाणून घ्या कारण...

का कुणी आयुष्यभर त्यांच पहिलं प्रेम विसरू शकत नसतं? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

Relationship Tips :  पहिलं प्रेम हे कधीच विसरता येत नाही, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात कधी प्रेम केलं असेल तर ते सुद्धा ही बाब नाकारणार नाही. कुणीही पहिलं प्रेम, पहिलं किस आणि पहिलं आलिंगण या अशा आठवणी असतात ज्या व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. 

असं नाही की, जीवनात केवळ एकदाच प्रेम होतं. लोकांना अनेकदा प्रेम होऊ शकतं. पण पहिलं प्रेम हे कधीही विसरता येत नाही. मात्र, असं कोणतं कारण असतं ज्यामुळे कुणीही आयुष्यभर त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. चला जाणून घेऊ कारण...

काय असतं याचं कारण?

रिलेशनशिप एक्सपर्ट एडीना महल्ली यांनी याबाबत सांगितलं की, तुमचं पहिलं प्रेम हा जीवनातील पहिला अनुभव असतो. हेच ते कारण असतं, ज्यामुळे तुम्ही कधीही पहिलं प्रेम विसरत नाहीत. एडीना सांगते की, आपल्या मेंदूत एक भाग असतो हिप्पोकॅंम्पस. यात आपल्या आठवणी आणि भावना असतात. मानसोपचारतज्ज्ञ मानतात की, आपल्याला दुसरीच्या तुलनेत पहिल्यांदा केलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. 

म्हणूनच जीवनात तुम्ही घेतलेला पहिला अनुभव कधीही विसरू शकत नाहीत. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीचा पहिला दिवसही विसरू शकत नाही जसे की, पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमात तुम्ही प्रेयसी किंवा प्रियकरासोबत भावनात्मक दृष्टीने इतके खोलवर जोडले गेलेले असता. त्यामुळे त्यांच्या आठवणी अधिक मजबूत असतात. पहिल्या प्रेमातील जाणीवा या फारच प्रबळ असतात, त्यामुळेच त्या कधी विसरता येत नाहीत किंवा मनातून जात नाही.

Web Title: Relationship : Why we not forget our first love know main reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.