पार्टनरसमोर आपलं प्रेम व्यक्त करायचंय?; मग 'या' 4 टिप्स फक्त तुमच्यासाठीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:36 AM2019-10-05T11:36:01+5:302019-10-05T11:36:36+5:30
अनेकदा आपण फिल्मी डायलॉग्स ऐकतो की, 'जिंदगी में प्यार एक ही बार होता है' पण सध्या चित्र बदललेलं आहे. हल्ली लोकांना फार लवकर प्रेम होतं.
(Image Credit : Elite Daily)
अनेकदा आपण फिल्मी डायलॉग्स ऐकतो की, 'जिंदगी में प्यार एक ही बार होता है' पण सध्या चित्र बदललेलं आहे. हल्ली लोकांना फार लवकर प्रेम होतं आणि मग मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते आपल्या मनातील गोष्टी समोरच्याला सांगतात. काहींचं प्रेम स्विकारलं जातं तर काहींच्या पदरी मात्र निराशा येते. यामुळे अनेकांना स्ट्रेस आणि डिप्रेशनचा सामना करावा लागतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगण्याच्या विचारात असाल तर आधी वेळ घ्या. अजिबात घाई करू नका.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर प्रेम व्यक्त करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करताना मदत होईल...
नात्याला वेळ द्या
कोणतंही नातं पुढे नेण्याआधी तुम्ही तुमच्या पार्टनरबाबात काही गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या. नात्याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी ते नातं खुलण्यासाठी वेळ द्या. समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टीही जाणून घ्या तसेच नात्याबाबत तुम्हाला जे वाटतं तेच तुमच्या पार्टनरलाही वाटत आहे का?, याचा विचार करा.
उत्तर आधीच ओळखा
ज्या व्यक्तीवर तुमचा जीव जडला आहे, त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केल्यावर त्याबाबत त्यांचं उत्तर काय असेल याचा अंदाज आधीच बांधा. कदाचित नंतर तुम्हाला रिजेक्शनचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उत्तर आधीच माहित असल्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शकतो.
दबाव आणू नका
तुम्ही स्वतःवर अजिबात दबाव आणू नका. नात्याला वेळ द्या आणि त्यानंतरच प्रेम व्यक्त करा. थोडा वेळ घेऊन त्यानंतरच आपलं प्रेम समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करा.
एखादा प्लान करून व्यक्त व्हा
आपल्या मनातील गोष्ट कुठेही सांगू नका. थोडा वेळ घेऊन एखादा प्लान करा. तुम्ही त्यांना एखादं सरप्राइजही देऊ शकता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवरही कोणत्या गोष्टीचा ताण येणार नाही.