Research : ‘या’ कारणामुळे भारतीय तरुणांना लग्न करण्याची असते जास्त घाई !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 08:03 AM2017-09-09T08:03:04+5:302017-09-09T13:33:04+5:30
ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता, काय कारण आहे जाणून घ्या...!
Next
लग्नाबाबत भारतीय तरुणांचे मत बदलत असून लग्नामुळे त्यांच्या आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असे त्यांना वाटते.
एका मॅचमेकिंग सर्विसने लग्नाबाबत तरुणांच्या विचारावर सर्वे केला असून त्यात सध्याची तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, हे जाणून घेण्यात आले.
सर्वेमध्ये सहभागी सुमारे २०.५ टक्के पुरुष आणि २३.१ महिलांचे म्हणणे होते की, ते लग्नासाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही आणि लवकरात लवकर लग्न करु इच्छिता.
त्यातच १२.२ टक्के पुरुष आणि १०.३ टक्के महिलांचे म्हणणे होते की, लग्न त्यांच्यासाठी नाही. तसेच १८. २ टक्के पुरुष आणि १३.२ टक्के महिलांचे म्हणणे होते की, ते अजून लग्नाबाबत विचार करण्यासाठी मॅच्युअर नाहीत.
लग्नासाठी नाही म्हणणाऱ्या लोकांना त्याचे कारण विचारले असता त्यातील बरेच लोकांनी सांगितले की, ते अजून जबाबदारी घेऊ इच्छित नाही. काहींनी असेही सांगितले की, त्यांना लग्नासारख्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही. त्यातच काही लोकांनी कमिटमेंटचेही कारण सांगितले.
या व्यतिरिक्त लग्न करु इच्छिणाऱ्या लोकांना याचा सर्वात मोठा फायदा विचारण्यात आले तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लग्नामुळे भावनात्मक स्थिरता येते हे कारण सांगितले. काही लोकांनी आर्थिक स्थिरतादेखील कारण सांगितले.
या आॅनलाइन पोलसाठी सुमारे १४ हजार ७०० प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यानुसार सध्याची तरुणाई लग्नाबाबत रिअॅलिस्टिक आहे, असे आढळून येते. तसे यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी आपल्या पार्टनरचे आपणास भावनात्मक आणि आर्थिक सहकार्य करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते.
Also Read : Health : लग्न करण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?