तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:12 AM2018-09-25T11:12:27+5:302018-09-25T11:12:46+5:30

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे.

Research reveals the right age gap for marriage | तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

तरुण-तरुणीमध्ये लग्नासाठी किती असावं वयाचं अंतर?

Next

प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे. दोघांमध्ये वयाचं किती अंतर आहे याने काही फरक पडत नाही. लग्नासाठीही मुलगा आणि मुलीमध्ये किती अंतर असावं याबाबत वेगवेगळी मते बघायला मिळतात. साधारणपणे मुलाचं वय जास्त आणि मुलीचं कमी असं गणित लावलं जातं. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार, मुलगी आणि मुलांमध्ये वयाचं अंतर योग्य असलं तर लग्न जास्त काळ टिकतं असं सांगितलं आहे. 

मुली आणि मुलामध्ये लग्न करताना योग्य वय असल्यास घटस्फोट होण्याची शक्यता कमी असते. हा शोध अटलांटाच्या एमोरी यूनिव्हर्सिटी व्दारे करण्यात आला. शोधात ३ हजार लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांना वैवाहिक जीवन, मुलं आणि पार्टनरसोबत नातं यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.  

५ वर्षाचं अंतर

शोधात त्या कपल्समध्ये घटस्फोटाची शक्यता अधिक दिसली ज्यांच्या वयात ५ वर्षाचं अंतर होतं. ही शक्यता १ वर्षाचं अंतर असलेल्यांमध्ये कमी होती. म्हणजे एक वर्षाचं अंतर असलेल्या कपल्समध्ये प्रेम आणि नातं अधिक मजबूत राहतं.  

१० वर्षाचं अंतर

दुसरीकडे ज्या कपल्समध्ये १० वर्षांतं अंतर होतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यता ३९ टक्के अधिक होती. आणि ज्यांच्यात २० वर्षांचं अंतर असतं त्यांचं लग्न तुटण्याची शक्यताही अधिक आढळली. 

एक वर्षाचं अंतर परफेक्ट

शोधादरम्यान अभ्यासकांनी स्पष्टपणे हे सिद्ध केलं की, ज्या कपल्समध्ये केवळ १ वर्षांचं अंतर असतं त्याचं लग्न अधिक काळ टिकतं. असे कपल्स अधिक आनंदी राहतात. 

Web Title: Research reveals the right age gap for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.