प्रेम केल्याने केवळ आनंद नाही तर या गोष्टीचाही होतो फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 03:27 PM2018-11-28T15:27:13+5:302018-11-28T15:27:36+5:30
प्रेम केल्याने आनंद मिळतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण प्रेम केल्याने आणखीही काही मिळतं जे कदाचित अनेकांना माहीत नसतं.
प्रेम केल्याने आनंद मिळतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण प्रेम केल्याने आणखीही काही मिळतं जे कदाचित अनेकांना माहीत नसतं. किंवा असं म्हणूया की, याकडे कुणी फारसं लक्ष देत नाहीत. शिकागो यूनिव्हर्सिटीतील अभ्यासिका स्टेफनी यांच्या रिसर्चनुसार, प्रेम केल्याने समजदारपणा आणि ज्ञान वाढतं. जे अभ्यासक प्रेमाला एक इमोशन, प्रिमिटीव्ह ड्राइव्ह किंवा एक ड्रग मानतात त्यांच्यापासून या रिसर्चमुळे स्टेफनी वेगळी ठरली आहे. स्टेफनी एक न्यरोसायंटिस्ट असून तिने तिच्या करिअरचा बराच काळ मेंदूवर प्रेमाचा प्रभाव काय आणि कसा होतो हे जाणून घालवला आहे.
स्टेफनीने न्यूरोइमेजिंगच्या माध्यमातून डेटा गोळा केला. या डेटाच्या माध्यमातून प्रेम केवळ इमोशनल ब्रेनच नाही तर त्या गोष्टींनाही अॅक्टिव करतो, ज्या बौद्धिक क्षमता आणि ज्ञानासाठी महत्त्वपूर्ण असतात.
स्टेफनी सांगते की, प्रेमाचं मूळ काम हे केवळ लोकांना जोडणं नाही तर आपला व्यवहार सुधारणे हेही आहे. प्रेमावरच्या या अभ्यासाने स्टेफनीला करिअरच्या सुरुवातीलाच यश मिळालं होतं. त्यावेळी ती पोस्टडॉक्टरल रिसर्चर होती. तिने रिसर्चचा विषय काही जवळच्या लोकांना आणि काही अनोळखी लोकांना सांगितला होता. यांना काही फोटो दाखवण्यात आले होते.
स्टेफनीने या डेटाचा वापर पॅशनेट, रोमॅंटिक लव्ह या बेसिक आनंद देणाऱ्या गोष्टींना दुसऱ्या प्रकारच्या प्रेमासोबत(आईचं प्रेम) वेगळं करण्यासाठी केला होता. सोबतच तिने मेंदूतील अशा १२ अंगांचा शोध लावला, जे याप्रकारच्या प्रेमाने अॅक्टिव राहतात.
स्टेफनीने सांगितले की, 'मला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने हैराण केले असेल, तर ती गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूमध्ये प्रेमाची एक सिग्नेचर आणि एकप्रकारची ब्लू प्रिंट असते'.
या अभ्यासात स्टेफनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी मेंदूच्या अशा भागाबाबत माहिती मिळवली, जो प्रेमाबाबत संवेदनशील असतात. या अभ्यासात सहभागी लोकांनी जितक्या मनमोकळेपणाने प्रेम केलं, तितकी जास्त मेंदूच्या त्या भागात अॅक्टिविटी आणि थकवा बघितला गेला.
कानाच्या मागच्या बाजूला असलेला हा अवयव केवळ मनुष्य आणि वेगळ्या प्रकारच्या माकडांमध्ये पाहिला जातो. हा अवयव क्रिएटीव्हीटीशी निगडीत असतो. स्टेफनीनुसार, प्रेम होणं या अवयवासाठी चांगल्या वर्कआउटसारखं असतं.