Rose Day : जाणून घ्या गुलाबाचं फूल कसं बनलं प्रेमाचं प्रतीक?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 10:47 AM2020-02-07T10:47:02+5:302020-02-07T10:53:57+5:30
गुलाब फुलाला संस्कृतमध्ये पाटलम् म्हंटलं जातं. भगवान कृष्णाच्या पूजेसाठी विशेषकरून गुलाब वापरलं जातं.
(Image Credit : flickr.com)
आज दुनियेत गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. व्हॅलेंटाइन्स विकची सुरूवात रोज डे पासून होते. शायरीमध्येही गुलाब व प्रेमाची सांगड घालून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला गुलाबाचा प्रेमाचं प्रतीक म्हणून वापर कधीपासून सुरू झाला हे सांगणार आहोत.
कधीपासून बनलं गुलाब प्रेमाचं प्रतीक
(Image Credit : Social Media)
गुलाबाचं प्रेमसंबंधाशी खूप जून नातं आहे. ग्रीक आणि रोमन सभ्यतेत गुलाबाला प्रेमाची देवी एफ्रोडिटी आणि वीनसबरोबर जोडलं गेलं आहे. देवांचं जेवण अमृत होतं. प्रेमाचे देवता क्यूपिड जेव्हा त्यांची आई देवी वीनससाठी अमृत घेऊन आले तेव्हा त्यांनी त्या अमृताचे काही थेंब त्या जागेवर शिंपडले. त्याच जागी पहिलं गुलाब उगवलं, अशी कथा सांगितली जाते.
ज्या तीन फुलांचा उल्लेख बायबलात करण्यात आला आहे त्यामध्ये गुलाब फुलाचा सहभाग आहे. हिंदू धर्मात गुलाब आणि कमळ ही दोन फुलं आहेत ज्यांना खूप पसंती मिळाली. गुलाब फुलाला संस्कृतमध्ये पाटलम् म्हंटलं जातं. भगवान कृष्णाच्या पूजेसाठी विशेषकरून गुलाब वापरलं जातं.
गुलाबाचा इतिहास
(Image Credit : wallpaperscraft.com)
गुलाब या फुलाला प्रेमाशी अडीचशे वर्षापासून जोडलं जातं. पण गुलाब या धर्तीवर खूप आधीपासून आहे. गुलाबाचं धरतीवरील अस्तित्व जवळपास साडे तीन करोड वर्षापासून आहे.
कल्पनेपेक्षा जास्त प्रकाराचे आहेत गुलाब
गुलाबाच्या शंभरहून अधिक विविध प्रजाती आहे. लाल गुलाब, सफेद गुलाबासाठी विविध कथा रचलेल्या आहेत. सगळ्यात मोठं गुलाब जवळपास 33 इंच म्हणजेच तीन फूट मोठं होतं. याचप्रकारे सगळ्यात लहान गुलाब तांदळाच्या दाण्याइतकं लहान होतं. दुनियेतील सगळ्यात जुनं गुलाबाचं झाड 1 हजार वर्ष जुनं आहे.
डोळे व पोटासाठी उपयुक्त गुलाब
गुलाबाच्या फुलाचा वापर खाण्यासाठीही केला जातो. भारतात गुलाबाच्या फुलापासून गुलकंद बनविण्याची पद्धत आहे. याचप्रकारे युरोपात गुलाबापासून वाईन तयार केली जाते. गुलाबात विटॅमिन सी असतं. काही ठिकाणी गुलाबापासू जाम, लोणचं व इतर पदार्थ तयार केले जाता.