एखाद्याला पाहून पहिल्या नजरेत प्रेम होत असतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 12:44 PM2019-07-01T12:44:21+5:302019-07-01T12:49:55+5:30
'तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो', 'पहली नजर का पहला प्यार', अशा गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असेल. एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणीच प्रेम होतं वगैरे या गोष्टींवर तुम्ही विश्वासही ठेवत असाल.
(Image Credit : blackmagicastrologer.com)
'तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो', 'पहली नजर का पहला प्यार', अशा गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असेल. एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणीच प्रेम होतं वगैरे या गोष्टींवर तुम्ही विश्वासही ठेवत असाल. तुमच्यासोबतही असं झालं असेल. पण याबाबत एक रिसर्च काही वेगळंच सांगतो. या रिसर्चनुसार, पहिल्या नजरेत जास्तीत जास्त केसेसमध्ये प्रेम नाही तर केवळ आकर्षण असतं.
काय सांगतो रिसर्च?
जर्नल ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन फॉर रिलेशनशिप रिसर्चमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये अभ्यासकांनी २० वयोगटातील २०० तरूण-तरूणींच्या ५०० डेटिंग केसेसचा अभ्यास केला. हा रिसर्चमध्ये तीन भागांमध्ये विभागला होता. एक ऑनलाइन, लेबॉरेटरी स्टडी आणि ९० मिनिटांची डेटिंग. ज्या सहभागी लोकांना डेटवर जाण्यास सांगण्यात आले होते, त्यांना विचारण्यात आले की, त्यांना पहिल्या नजरेच्या प्रेमाची काही जाणिव झाली किंवा नाही. किंवा ते समोरच्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीकडे पाहून इम्प्रेस झालेत.
अभ्यासकांनी सहभागींमध्ये प्रेमासाठी जोश, इंटिमसी आणि कमिटमेंटसारख्या गोष्टींकडे लक्ष दिलं. यातूनही त्यांना रिलेशनशिपच्या क्वॉलिटीची माहिती मिळाली.
खरंच पहिल्या नजरेत प्रेम झालं का?
आकडेवारीनुसार, ३२ सहभागी लोकांना पहिल्या नजरेत प्रेमाची जाणिव झाली आणि यातून इंटिमसी किंवा कमिटमेंट गायब होती. तसेच या लोकांना समोरच्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीकडे बघूनही आकर्षण वाटतं.
काय निघाला निष्कर्ष?
अभ्यासकांनी सांगितले की, पहिल्या नजरेतील प्रेम केवळ आकर्षण असतं. जास्तीत जास्त लोकांसोबत हेच झालं.
पुरूषांसोबत असं अधिक होतं?
या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या ६० टक्के पुरूषांना पहिल्या नजरेत प्रेम झालं. त्यासोबतच रिसर्चमध्ये दुसऱ्या पार्टनर्सना पहिल्या नजरेत प्रेम झालं असं काही समोर आलं नाही. म्हणजे दोघांपैकी एकाला पहिल्या नजरेत प्रेमाची जाणिव झाली तर दुसऱ्याला अशी जाणिव झाली नाही.