गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 04:15 PM2020-01-14T16:15:52+5:302020-01-14T16:17:14+5:30

प्रत्येक व्यक्ती आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो.

The scientific reasons of partners hangar in relationship | गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...

गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी  होणार नाही तिच्यातील रोमान्स...

Next

(image credit-www. momjunction.com)

प्रत्येक व्यक्ती आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. कारण पार्टनर ही आयुष्यतील खूप खास  व्यक्ती असते. त्या व्यक्तीसा इंप्रेस करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो.  पार्टनरला खूश करण्यासाठी  वेगवेगळे मार्ग लोकं शोधत असतात. पण तुम्हाला  माहीत आहे का नुकत्याच झालेल्या एका संशोधनात मुलींना इम्प्रेस कसं करायचं या बाबत संशोधन करण्यात आलं आहे. जर तुम्हाला सुद्धा आपल्या पार्टनरला  इम्प्रेस करायचं असेल हा रिसर्च काय  सागंतो ते जाणून घ्या.

Image result for COUPLE(image credit- showbiz cheat sheet)

फिलाडेल्फिया च्या ड्रेक्सेल यूनिवर्सिटी आणि यूनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनिया इथल्या संशोधकांनी संधोधन केले आहे.  यात जी गोष्ट उघड झाली ते ऐकून  तुम्ही हैराण व्हाल.  ज्या महिला पोटभर अन्नाचं सेवन करतात. त्या महिला रोमांस करण्यासाठी जास्त उत्साही असतात.  या उलट ज्या स्त्रिया उपाशी असतात. त्यांना रोमांस करण्यात फारसा रस नसतो. 

 (image credit-red book)

हा रिसर्च खूप  मजेदार वाटतं असला तरी यात उघड झालेल्या गोष्टी या  सत्य आहेत.  या संशोधनासाठी फिमेल स्टुडर्सना ८ तासांसाठी उपाशी राहण्यास सांगितले.  नंतर त्यानंतर त्यांना  फोटेो दाखून एमआरआय करण्यात आले. यात असं दिसून आलं की  ज्यांनी ८ तास काही खाल्ले नव्हते त्यांच्या रिएक्शन बदललेल्या नव्हत्या.  त्यांना कपल्स, कॅण्डला लाईट असे फोटो दाखवण्यात आले.  तरीही त्या महिलांच्या हावभावांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. नंतर  त्याच मुलींना 500  कॅलरीज असणारा चॉकलेट शेक देण्यात आला.  हा चॉकलेट शेक प्यायल्यानंतर त्या मुलींच्या हावभावांमध्ये बदल झाला होता.  तसंच फोटोज पाहून त्यांना रोमान्स करण्याची ईच्छा होत होती. 

(image credit- canva)

संशोधकांच्या मते उपाशी असलेल्या महिलांचा  सगळ्याच आधी फोकस खाण्यावर असतो. जर त्या उपाशी नसतील तर प्रेम, रोमान्स सेक्स या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात. जर तुम्ही पार्टनर सोबत असताना गोड खात असाल तर रोमान्स करण्याचा मुड जास्त होण्याची शक्यता असते.  कारण गोड खाल्ल्याने डोपामीनचे प्रमाण वाढत असते.  महागडे गिफ्ट देण्यापेक्षा  गर्लफ्रेन्डच्या भूकेकडे आधी लक्ष द्या.  जर तुमच्या पार्टनरचं पोट भरलेलं असेल तर तुमच्यासोबत रोमान्स करण्याचा चांगला आनंद घेऊ शकतील. 

Web Title: The scientific reasons of partners hangar in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.