विवाहित असूनही इथे सिंगल लाइफ जगतात कपल्स, सुरू झाला अनोख्या लग्नाचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:26 AM2023-10-02T09:26:37+5:302023-10-02T09:27:02+5:30

मुळात सेपरेशन मॅरेज कपल्सना विवाहित असण्याचा आणि एकटे राहण्याचा कंबाइंड बेनिफिटे देतं.

Separation marriage as married couple never lived in same home | विवाहित असूनही इथे सिंगल लाइफ जगतात कपल्स, सुरू झाला अनोख्या लग्नाचा ट्रेंड

विवाहित असूनही इथे सिंगल लाइफ जगतात कपल्स, सुरू झाला अनोख्या लग्नाचा ट्रेंड

googlenewsNext

अलिकडे लग्नाबाबतचे वेगवेगळे ट्रेंड चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या जपानमध्ये 'सेपरेशन मॅरेज' किंवा विकेंड मॅरेज किंवा लग्न करूनही वेगळं राहण्याची कॉन्सेप्ट लोकप्रिय होत आहे. या कॉन्सेप्टमध्ये लोक एकीकडे एकमेकांचं प्रेम आणि सपोर्टचा आनंद घेतात. तेच दुसरीकडे आपल्या जोडीदाराची चिंता करण्याऐवजी सिंगल लाइफ जगत आहेत. मुळात सेपरेशन मॅरेज कपल्सना विवाहित असण्याचा आणि एकटे राहण्याचा कंबाइंड बेनिफिटे देतं. पण हे महत्वाचं असतं की, नात्यात एकमेकांवर प्रेम आणि सन्मान असावा.

एका न्यूज चॅनलने सेपरेशन मॅरेज केलेल्या एका जपानी जोडप्याची स्टोरी दाखवली होती. हिरोमी टाकेडा स्वत:ला एक मजबूत आणि स्वतंत्र महिला सांगते. ती एक फिटनेस ट्रेनर आणि जिम मॅनेजर आहे. तिचा पती हिदेकाजू एक बिझनेस अॅडव्हायजर आहे जो त्याचा जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर घालवतो. दोघांची लाइफस्टाईल फार वेगळी आहे. मात्र, त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे आणि दोघे एकमेकांचा सन्मानही करतात. ते एकमेकांच्या जीवनात लुडबुड करत नाहीत. अशात त्यांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

हिदेकाजूने सांगितलं की, 'मी क्वचितच माझ्या पत्नीच्या घरी रात्रभर थांबतो. माझं करिअर माझ्यासाठी महत्वाचं आहे. आपल्या आधीच्या लग्नादरम्यान मी माझ्या कामात इतका व्यस्त होतो की, मी कधी कधी अनेक दिवस घरीच जात नव्हतो. यामुळे माझी आधीची पत्नी फार दु:खी झाली होती. अशात माझ्या आधीच्या लग्नातून मला हे समजलं की, महिलांनी आर्थिक रूपाने स्वतंत्र व्हायला हवं.
तेच हिरोमी टाकेडा सांगते की, 'जर माझा पती घरी असेल तर मला काही गोष्टी करण्यात अडचणी येतील. ज्यामुळे मला तणाव येतो. त्यामुळ अशाप्रकारच्या लग्नामुळे मी तणावमुक्त आहे'.

हिरोमी आणि हिदेकाजू यांना एक मुलही आहे जे आईसोबत राहतं. ते आठवड्यातून केवळ 2 किंवा 3 वेळा भेटतात. खासकरून तेव्हा तेव्हा जेव्हा हिरोमीला मुलाचा सांभाळ करण्यात गरज लागते. ही लाइफस्टाईल दोघांनाही फायदा देते. पण त्यांच्या काही शेजाऱ्यांना वाटतं की, दोघेही वेगळे झाले आहेत त्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांचं मत आहे की, लग्नासाठी सोबतच राहणंच गरजेचं नाही.

हिरोमी टाकेडा म्हणाली की, सोबत राहणं काही गरजेचं नाही. मी आणि माझा पती आपल्या जीवनात संतुष्ट आहोत. आम्ही असं लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला सुरक्षित वाटावं. कारण आमच्याकडे भावनात्मक रूपाने आमचं समर्थन करणारं कुणीतरी आहे आणि सोबतच आम्ही इंडिव्हिजुअल लाइफस्टाईल कायम ठेवण्यातही सक्षम आहोत.

Web Title: Separation marriage as married couple never lived in same home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.