ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 12:50 PM2018-04-28T12:50:03+5:302018-04-28T15:35:19+5:30

जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता.

Signs which indicates that you should end your relationship | ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

ही लक्षणे दिसतील तर लगेच करा ब्रेकअप

Next

अनेकांना प्रेमाचं नातं सुरुवातीला फारच चांगलं, मजेशीर वाटतं. पण जसाजसा वेळ पुढे जातो त्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. वेळेनुसार, परिस्थितीनुसार सगळं बदलेलं असतं. पार्टनरसोबत असूनही तुम्ही एकटे फिल करू लागता. त्या नात्यात मग काही अर्थ उरलेला नसतो. अशात वेळीच जर त्यावर काही विचार केला नाही, तर दोघांचही जगणं कठीण होऊन बसतं. चला जाणून घेऊया अशीच काही लक्षण ज्यावरुन तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहीलं नाही हे कळू शकतं.

पार्टनरचा चिडचिडपणा वाढणे -

जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असेही असू शकते की, त्याचा/तिचा मूड ठिक नसेल, पण अशा गोष्टी जर पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा नात्याला किती पुढे घेऊन जायचं याचा विचार करायला हवा.

स्वाभिमान न जपणे - 

कोणत्याही नात्याप्रमाणे प्रेमाच्या नात्यातही ऐकमेकांचा सन्मान करणं महत्वाचं असतं. दोघांचही महत्व सारखं असतं. तुम्ही कोणत्या ना कोणत्या रुपात ऐकमेकांना मदतच करत असता. पण जर तो किंवा ती तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्हाला वेळीच या नात्याबद्दल विचार करणे फायद्याचं ठरेल.

स्व:ताला सिद्ध करण्याची खुमखुमी -

नात्यात स्वत:ला सिद्ध करणं हे एक काम संघर्षाचं आणि विनाकारणचं असतं. जर तुमच्यात प्रेम आहे तर कुणाला काहीही सिद्ध करण्याची गरज नसते. पण प्रेमात कमतरता आली तर पार्टनरला काही गोष्टी खटकायला लागतात. अशात पार्टनरसोबत मोकळेपणाने बोलून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. 

नात्यात नाटकीपणा - 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा तुम्हाला माहीत आहे की, सगळं काही ठिक आहे पण काही गोष्टी जबरदस्तीने मान्य करुन तुम्ही आनंदी असल्याचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहात, तर वेळीच याचा विचार करा. खोटं आणि दिखावा असलेलं नातं फार काळ टिकत नाही. 

ऐकमेकांना टाळणं - 

जर तुम्ही विचार करता की, उगाच विषय वाढेल किंवा त्याचा/तिचा मूड ठिक नसल्याने त्याच्या/तिच्याकडे जाण्याची भीती वाटत असेल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऐकमेकांना टाळत असाल तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं. 

केवळ आठवणीच राहिल्या -

जेव्हा तुम्ही विचार करता की, आधी तुम्ही दोघे किती आनंदी, सकारात्मक, उत्साही आणि मोकळे राहत होते. वेळेनुसार ते नातं पूर्णपणे बदललं आहे. जेव्हा पार्टनर सोबत असतो तरी तुम्ही आनंदी राहत नसाल आणि तुम्हाला काहीही बोलण्याआधी विचार करावा लागत असेल तर हे ते नातं संपल्याची लक्षणे आहेत.

Web Title: Signs which indicates that you should end your relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.