प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:08 PM2019-03-23T15:08:32+5:302019-03-23T15:09:06+5:30

एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. खासकरून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमची पार्टनर असते.

Signs you are dealing with unrequited love what do about it | प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करावं?

प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करावं?

Next

एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. खासकरून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुमची पार्टनर असते. तुम्हाला भलेही त्या व्यक्तीच्या प्रेमात रहायचं असतं कारण तुम्हाला कुठेतरी असा विश्वास असतो की, भविष्यात ती व्यक्ती तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्यासोबत असेल. पण प्रत्येकवेळी जसा आपण विचार करतो तसं होतंच असं नाही. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं अनेकदा त्या व्यक्तीकडून प्रेम मिळत नसतं. ज्याच्यासोबत हे घडतं ती व्यक्ती स्वत:च्या नशीबाला दोष देते. 

तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत आनंदाने जीवन जगायचं असतं, पण तोच उत्साह तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्यवहारातून दिसत नाही. हे तर सर्वांनाच माहीत असतं की, रिलेशनशिप यशस्वी ठेवण्यासाठी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते. 

असंही झालं असेल की, तुम्ही स्वत: त्या स्थितीमध्ये पोहोचले असाल. तुम्ही तुमचा सगळा वेळ केवळ तुमच्या पार्टनरला दिली असेल. पण तसं समोरून झालं नसेल तर तुम्हाला स्वत: विचित्र अडचणीत अडकल्यासारखं वाटतं. अशात हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

जर तुम्ही अशाच काहीशा स्थितीचा सामना करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यात सर्वात महत्त्वाची ही आहे की, काय खरंच तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नकोसे झाले आहात?

१) तुम्हाला जाणवत असेल की, पार्टनर तुम्हाला टाळतोय किंवा टाळते.

२) तुम्हाला मिळत नाही त्यापेक्षा जास्त तुम्ही नात्याला देताय. 

३) कडलिंगदरम्यान पार्टनरची चिडचिड होते.

४) तुमचा पार्टनर दुसऱ्यांसोबत फ्लर्ट करतो. 

५) पार्टनर तुमच्यासोबत फार जास्त वेळ घालवत नसेल.

६) बेडरूममध्येही पार्टनरचा फार इंटरेस्ट नसतो. 

७) पार्टनरचा फोन चेक केल्यावर चिडचिड होते

८) पार्टनर तुमच्यासोबत फार जास्त खोटं बोलत असेल

९) तुम्ही रिलेशनशिपमध्ये असूनही एकटेपणा फिल करता.

अशात काय करावं?

अशी परिस्थिती जर समोर असेल तर तुम्ही परिस्थितीला मान्य केल्याशिवाय काही करू शकत नाही. तुम्हाला हे समजून यायला हवं की, तुम्हाला हवं असलेलं प्रेम हे नाही. जेव्हा समोरून याचा खुलासा होईल त्यावेळी अधिकच वाईट वाटेल आणि दु:ख होईल. दोन्हीकडून त्रास तुम्हालाच होणार आहे. 

स्वत:ला माफ करा

सर्वातआधी तर या नात्यात येण्यासाठी स्वत:ला माफ करा. या रिलेशनमधून बाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करा. घाई अजिबात करू नका. यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. 

एकट्याने हे ओझं सहन करण्याची गरज नाही

तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, हे ते साधं ओझं नाहीये जे तुम्ही एकट्याने सहन करू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची मदत घेऊ शकता. तसेच हे नातं यशस्वी झालं नाही म्हणजे तुम्ही पुन्हा प्रेम करू शकत नाही किंवा तुम्हाला कुणी प्रेम करणारं मिळणार नाही असं नाहीये. आयुष्याच्या वळणांवर तुम्हालाही प्रेम मिळेल.

दुरावा ठेवा

पार्टनरसोबत दुरावा ठेवायला सुरूवात करा. तुम्ही पार्टनरपासून दूर गेल्याशिवाय यातून बाहेर पडूच शकत नाही. जर तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर जबरदस्तीने स्वत:ला लादू शकत नाही. 

प्रेमावर ठेवा विश्वास

एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही हार मानू नये. प्रेमाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. त्यानेच तुमचा त्रास कमी होईल. प्रेमावरील विश्वास उडू देऊ नका. 
 

Web Title: Signs you are dealing with unrequited love what do about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.