गर्लफ्रेंड प्रेम करते की फक्त तुमचा फायदा घेतेय, कसं ओळखाल? वापरा 'ही' ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:51 PM2020-02-28T12:51:08+5:302020-02-28T13:15:06+5:30
घरच्यांना वेळ देण्यापासून रोखत असेल किंवा घरच्यांवर प्रकारचे पैसे खर्च करण्यासाठी रोखठोक लावत असेल तर निव्वळ तुम्हाला त्रास करून घेण्यासाठी नातं कंटिन्यू करू नका.
कपल्सच्या प्रेमाचं नातंच असं असतं. ज्यात कपल्स एकमेकांना खुश करण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवत असतात. पण तुम्ही तुमच्या पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तर एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे तुमची पार्टनर तुमचा वापर तर करून घेत नाहीये ना.. हे माहित असायला हवं कारण जर तुम्ही याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होऊन तुम्ही वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त होत असता. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची गर्लफ्रेंड केवळ टाईमपास करण्यासाठी तुमच्यासोबत राहत नाहीना.
१) पैश्यांबद्दल विचारणं
जर तुम्ही गर्लफ्रेंड नेहमी तुमच्या प्रोपर्टीवरून किंवा पगारावरून तुम्हाला बोलत असेल तर जरा सांभाळून रहा. पण पार्टनर तुम्हाला इन्वेस्टमेंट किंवा पैसे वाचवण्याचा सल्ला देत असेल तर तीला तुमच्या भविष्याची काळजी वाटते. याऊलट जर पार्टनर तुमच्या पगाराबद्दल विचारणा करून तुम्हाला सतत त्रास देत असेल तर स्पष्ट शब्दात समजावून सांगा किंवा तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण याचा अर्थ असा असू शकतो की तुमची पार्टनर फक्त पैश्यांसाठी तुमच्यासोबत आहे.
२) नाराज होणं आणि गिफ्टसची मागणी
जर प्रत्येक गोष्टीला तुमची गर्लफ्रेड गिफ्ट्सची मागणी करत असेल किंवा तुम्ही गिफ्ट दिल्याशिवाय तिचा राग शांत होत नसेल तर ही लक्षणं काही चांगली नाही. कारण तीचं रागवणं ही महागडी गिफ्ट मिळवण्यासाठी सुद्धा असू शकतं. जर तीचं प्रेम खरं असेल तर भांडण झाल्यानंतर गिफ्टची मागणी न करता प्रेमाने समावून सांगण्याचा प्रयत्न करेल.
३) फिरण्याची आणि रेस्टॉरंटला जाण्याची डिमांड
जर तुमची गर्लफ्रेंड क्वालिटी टाईम स्पेड करण्याच्या नावावर जर तुम्हाला महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जाण्याची डिमांड करत असेल किंवा सतत लंच आणि डिनरला बाहेर घेऊन जाण्यासाठी आग्रह करत असेल तर याचा अर्थ असा होतो की तिला तुमची कंपनी नाही तर लग्जरीस लाईफ जगण्यात जास्त इन्टरेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्या त्रास सुद्धा होऊ शकतो.
४) इतर मुलांसोबत फ्लर्ट
रिलेशनशिपमध्ये असताना तुमची पार्टनर जर तुमच्या स्मार्ट आणि हॅण्डसम असलेल्या मित्राशी किंवा कोणत्याही अनोळखी मुलाशी फ्लर्ट करत असेल तर हे तुमच्या नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला पार्टनर कधीही सोडून जाऊ शकते. त्यामुळे असं वागणं दिसून येत असेल तर सावध रहा.
५) मित्र आणि कुटुंबापासून दूर राहायला सांगणं
जर तुमची पार्टनर तुम्हाला मित्रांना वेळ देण्यापासून , घरच्यांना वेळ देण्यापासून रोखत असेल किंवा घरच्यांवर पैसे खर्च करण्यासाठी रोखठोक लावत असेल तर निव्वळ तुम्हाला त्रास करून घेण्यासाठी नातं कंटिन्यू करू नका. स्पष्ट बोलून योग्य तो निर्णय घ्या. ( हे पण लावा-'या' ५ कारणांमुळे इच्छा नसताना सुद्धा लोक लग्न करतात)
६) सेल्फ रिस्पेक्ट
जर तुमची पार्टनर तुमचं म्हणणं इग्नोर करत असेल किंवा तुमचा आदर करत नसेल तर हे तुमच्या नात्यासाठी अनुकूल नाही. प्रत्येकाला स्वतःचा आत्मसन्मान महत्वाचा वाटत असतो. स्वतःची चुक मान्य न करणे, अनेकदा प्रयत्न करूनही माफ न करणे, स्वतःच्या मित्रांसमोर तुम्हाला घालून पाडून बोलणे यामुळे तुमचा इगो हर्ट होण्याची शक्यता असते. म्हणून तुमची पार्टनर अशा प्रकारचं वागणं ठेवत असेल तर तिच्यापासून लांब रहा. ( हे पण वाचा-तुम्हाला तुमचा पार्टनर वापरून तर घेत नाहीये ना कसं ओळखाल?...)