बिल मुरेसह छोट्या मोगलीची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2016 03:44 AM2016-04-02T03:44:05+5:302016-04-01T20:44:05+5:30
जिमी केमेलच्या शोमध्ये बिल आणि नीलने ‘द बेअर नेसेसिटीज’ हे गाणे एकत्र गायिले.
Next
आ ल्या सर्वांच्या आवडत्या मोगलीला भेटण्यसाठी आता केवळ एक आठवड्याचा अवकाश आहे. नव्वदच्या दशकात आपल्यापैकी बºयाच जणांची दुरदर्शनवर दाखविले जाणाऱ्या जंगल बुक कार्टूनमधून मोगलीशी चांगली ओळख झालेली आहे. बलू, शेरखान, बगीरा ही नावे घराघरात पोहोचली.
त्यामुळे आता एवढ्या काळानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी ‘द जंगल बुक’ या चित्रपटातून मिळणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आले.
नुकेतच प्रोमोशनसाठी चित्रपटात मोगलीची भूमिका करणारा नील सेठी आणि ‘बलू’ला आवाज देणारा बिल मुरेने जिमी केमेलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी तुफान केली.
बिल आणि नीलने ‘द बेअर नेसेसिटीज’ हे गाणे एकत्र गायिले. कसलाही सराव न करता या दोघांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे गाणं सादर केले. ते ऐकून प्रेक्षक आणि जिमी स्वत: खूप प्रभावित झाला.
येत्या आठ एप्रिल रोजी ‘द जंगल बुक’ भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या हिंदी डबिंगसाठी नाना पाटेकर, प्रियंका चोपडा, इरफान खान, ओम पुरी, शेफाली शहा यांसारख्य दिग्गजांनी आवाज दिला आहे.
‘जंगल जंगल बात चली है...’ असे म्हणत मोठी झालेल्या पीढी बरोबरच नवीन मुलांनाही चित्रपट नक्कीच पाहायला आवडणार यात काही शंका नाही.
नोबेल पारितोषिक विजेते लेखक रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेला ‘द जंगल बुक’ हा कथासंग्रह 1894 साली प्रकाशित झाला होता. त्यांच्या लहान मुलींसाठी त्यांनी या संग्रहातील कथा लिहिल्या होत्या. तेव्हापासून आजतयागत सर्वोत्कृष्ट बालसाहित्य म्हणून त्याची लोकप्रियता टिकून आहे.