जर तुम्हीही हे काम करत असाल तर तुम्हाला नाही मिळणार पार्टनर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:20 PM2018-10-09T12:20:45+5:302018-10-09T12:21:01+5:30
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते. सिंगल असो वा कमिटेड प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक क्रश असतोच.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते. सिंगल असो वा कमिटेड प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक क्रश असतोच. ज्यावर क्रश आहे ती व्यक्ती दिसली तरी चेहऱ्यावर स्माईल येते. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागत असते. पण एका शोधानुसार, मुलींनी जर आपल्या क्रशला 'स्मोक' करताना पाहिलं तर त्यांचं हृदय तुटतं. आणि त्यांचा आपल्या क्रशमधील इंटरेस्ट कमी होतो.
हे ऐकायला जरा विचित्र वाटत असेल आणि यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण इनोजेन नावाच्या एका कंपनीने एकूण १००० लोकांवर एक सर्वे केलाय. ही सर्व लोक १० ते ७६ वयोगटातील होते. यातील ५७ टक्के लोक हे धुम्रपान करणारे होते, २४.३ टक्के धुम्रपान करणारे नव्हते आणि इतर १८.७ टक्के लोक हे सिगारेटऐवजी इलेक्ट्रॉनिक डिवाईसने स्मोक करणारे होते.
सर्वे दरम्यान अनेक प्रकारचे प्रश्न या सहभागी लोकांना विचारण्यात आले. अभ्यासाच्या शेवटी महिलांकडून मिळालेली उत्तरे चक्रावून सोडणारी होती. ७० टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना असे पुरुष पसंत नाहीत जे स्मोक करतात. तर ५६ टक्के महिलांनी सांगितले की, त्या अशा मुलांना डेट करत नाहीत जे स्मोक करतात.
सामान्यपणे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येच स्मोक करण्याची सवय अधिक बघायला मिळते. त्यामुळे अर्थातच पुरुषांना स्मोक करणाऱ्या लोकांची काही अडचण नसेल. पण काहींचा हाच विचार या अभ्यासाने चुकीचा ठरवला आहे.
या अभ्यासात सहभागी झालेल्या काही पुरुषांनी स्वत: हे मान्य केलं की, त्यांना स्मोक करणारे पुरुष पसंत नाहीत. ४६ टक्के पुरुषांनी हे कबूल केले की, ते स्मोक करणाऱ्या महिलांना अजिबात डेट करणार नाही. ६५ टक्के पुरुषांनी सांगितले की, त्यांना स्मोक करणे किंवा असे करताना कुणाला बघणे यात काहीच आकर्षण वाटत नाही.
स्मोक करणाऱ्यांकडून काय अडचण?
या अभ्यासात सहभागी झालेल्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की, स्मोक करणाऱ्या व्यक्तींना डेट करणे त्यांना का आवडणार नाही? यावर मिळालेलं उत्तर फारच इंटरेस्टींग होतं. ९१ टक्के लोकांनी सांगितले की, सिगारेटच्या वासाची त्यांना अडचण आहे. ७५ टक्के लोकांनी सांगितले की, स्मोक करणे आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्यामुळे ते कधीच स्मोक करणाऱ्या व्यक्तींना डेट करणार नाहीत.