पत्नीला स्पेशल सरप्राइज देण्यासाठी खास आयडिया, एकदा करून बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 14:10 IST2019-10-17T13:36:35+5:302019-10-17T14:10:54+5:30
Gift Ideas For Wife : जर तुमचं कुणावर प्रेम असेल तर वेळोवेळी तुम्हाला त्या व्यक्तीला ही जाणीव करून देणं गरजेचं असतं की, ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत.

पत्नीला स्पेशल सरप्राइज देण्यासाठी खास आयडिया, एकदा करून बघाच!
जर तुमचं कुणावर प्रेम असेल तर वेळोवेळी तुम्हाला त्या व्यक्तीला ही जाणीव करून देणं गरजेचं असतं की, ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत. पती-पत्नीच्या नात्यात ही गोष्टी अधिकच गरजेची ठरते. कारण वेळ आणि जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्यातील प्रेमाचा स्पार्क कुठेतरी हरवलेला असतो. पार्टनरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची वाट बघण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही कधीही त्यांना स्पेशल फील करवू शकता. याने तुमच्यातील बॉंड अधिक मजबूत होतो. चला जाणून घेऊ अशाच काही खास आयडिया...
लव्हस्टोरीचा व्हिडीओ करा तयार
(Image Credit : vimeo.com)
तुम्ही तुमची लव्ह लाइफ एका सुंदर व्हिडीओमध्ये कन्व्हर्ट करू शकता. हा व्हिडीओ पत्नीला दाखवून तुम्ही तुमच्या जुन्या दिवसांची आठवण त्यांना करवून देऊ शकता. जेव्हा तुम्ही सोबत बसून जुने व्हिडीओ किंवा फोटो बघता तेव्हा तुमची जवळीकता आणखी वाढते. असा व्हिडीओ तुम्ही ऑनलाइन स्वत: तयार करू शकता किंवा कुणाच्या मदतीने तयार करून घेऊ शकता.
प्रोफेशनल फोटोशूट
(Image Credit : formedfromlight.com)
सोशल मीडियाच्या विश्वात प्रत्येकाजण त्यांचे स्पेशल मोमेंट्स फोटोंच्या माध्यमातून लोकांशी शेअर करतात. अशात तुम्ही तुमच्या पत्नीसोबत स्पेशल फोटोशूट करू शकता. समोर दिवाळी आहे, तेव्हा करा नाही तर या गुलाबी थंडीत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करूनही तुम्ही फोटोशूट करू शकता. हे क्षण दोघांसाठीही नेहमी लक्षात राहणारेच असतील.
कस्टमाइज पेंडेंट, ज्वेलरी
(Image Credit : mirror.co.uk)
ज्वेलरी प्रत्येक महिलेची कमजोरी मानली जाते. तुम्ही त्यांना यूनिक ज्वेलरी भेट देऊ शकता. त्यांना तुम्ही फोटो लॉकेट देऊ शकता. तसेच त्यांच्या आवडीनुसार कस्टमाइज ज्वेलरी गिफ्ट करू शकता.
रोमॅंटिक डिनर
तशी तर ही फारच जुनी आणि कॉमन आयडिया आहे, पण ऑलटाइम हिट आयडिया आहे. पत्नीला सहज तुम्ही डिनरला घेऊन जाऊ शकता. आधीच टेबल बुकिंग करून तुम्ही त्यावर डेकोरेशनही करायला सांगू शकता.
रोमॅंटिक पत्र
बाहेर जायची इच्छा नसेल तर सर्वात स्वस्त अशी आयडिया म्हणजे पत्नीसाठी एक रोमॅंटिक पत्र लिहा. अलिकडे व्हॉट्सअॅपच्या जमान्यात पत्र लिहिणं जणू बंदच झालं आहे. अशात जर तुम्ही पत्नीसाठी एक रोमॅंटिक पत्र लिहाल तर त्यांना यापेक्षा दुसरा मोठा आनंद होणार नाही.
पायांची मसाज
वरील कोणत्याच आयडिया तुम्हाला पसंत नसतील तर तुम्ही पत्नीच्या पायांची मसाज करू शकता. आता अचानक तुम्ही असं काही कराल तर विचार करा की, त्यांना किती आनंद होईल. कारण दिवसभराच्या कामात त्यांना किती त्रास होतो, याकडे त्या स्वत:ही दुर्लक्ष करतात. अशात तुम्ही त्यांना असा सुखद धक्का देऊ शकता.