लग्नावर कमी खर्च करणं ठरू शकतं तणावाचं अन् घटस्फोटाचं कारण! - सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:37 PM2019-10-10T14:37:38+5:302019-10-10T14:44:58+5:30
लग्न यादगार करण्यासाठी लोक नको नको ते करतात. लग्नात कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सगळ्याच गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो.
(Image Credit : medium.com)
लग्न यादगार करण्यासाठी लोक नको नको ते करतात. लग्नात कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सगळ्याच गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. महागड्या लोकेशनवर लग्न करणं आणि ३-४ वेळा लग्नाचं रिसेप्शन देणं हा अलिकडे ट्रेन्ड होत चालला आहे.
या महागड्या लग्नांवर अनेकदा टीका सुद्धा होते. काही लोकांचं म्हणणं आहे की, लग्न आपल्या बजेटमध्येच करावं. शोऑफ बंद करून बजेटमध्ये लग्न करण्याचा सल्लाही लोक देतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, स्वस्तात किंवा कमी खर्चात लग्न करूनही तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. ज्याचा परिणाम म्हणजे पुढे जाऊन तुमचा घटस्फोटही होऊ शकतो. असं आम्ही म्हणत नाही तर परदेशात करण्यात आलेल्या एका ऑनलाइन सर्व्हेमधून समोर आलं आहे.
काय सांगतो सर्व्हे?
नोवी मनी द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेतून एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. गेल्या १० वर्षात लग्न करणाऱ्या १ हजार लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला. या कपल्सकडून ही माहीत घेण्यात आली की, लग्नात त्यांनी स्वत:वर किती खर्च केला होता आणि किती बिल भरलेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर या खर्चांवर त्यांची मत जाणून घेण्यात आलीत.
सर्व्हेनुसार, लाखो रूपये खर्च करूनही जास्तीत जास्त लोक वैवाहिक जीवन बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने जगत आहेत. तर लग्नात जवळपास ७० हजार रूपयांपेक्षा कमी खर्च करणारे कपल्स त्यांच्या लग्नात आनंदी दिसले नाहीत.
जास्त पैसे वाचवणं लग्नासाठी घातक
मजेदार बाब ही आहे की, सर्व्हेमध्ये घटस्फोटीत आणि दुसरं लग्न करणाऱ्या लोकांनी हे मान्य केलं की, त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नात १ हजार डॉलर म्हणजे साधारण ७० हजार रूपयांपेक्षा कमी खर्च केला होता.
जास्त खर्चही चुकीचा
लग्नावर पाण्यासारखा पैसा खर्च करणंही योग्य नाही. सर्व्हेमध्ये असे लोकही होते ज्यांनी लग्नावर फार कमी पैसा खर्च केला. पण ते त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी दिसले. प्रमाणापेक्षा जास्त खर्च तणावाचं कारणही होऊ शकतं. शो-ऑफसाठी महागडं लग्न करणारे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात आणि त्यांच्यावर मानसिक दबावही पडतो.