भांडकुदळ बायकांचा विमानात धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2016 05:08 PM2016-03-11T17:08:01+5:302016-03-11T10:08:01+5:30
मुंबईच्या लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या भांडणांची आठवण करून देणारा प्रकार अमेरिकेत एका विमान प्रवासा दरम्यान घडला.
Next
त म्ही बस-रेल्वेमध्ये जागेवरून, घोरण्यावरून भांडण झाल्याचे पाहिले असेल. विमानातही लोक भांडण करतात असे, सांगितल्यास तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही. मुंबईच्या लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या भांडणांची आठवण करून देणारा प्रकार अमेरिकेत एका विमान प्रवासा दरम्यान घडला.
बाल्टिमोर ते लॉस एंजलिस फ्लाईटचा प्रवास नेहमी प्रमाणे शांतीत सुरू होता. आणि अचानक विमानात जोरजोरात गाण्याचा आवाज येऊ लागला. सर्व प्रवाशी आवाज कुठून येतोय हे पाहू लागले तेव्हा दोन जणी आपल्याच धुंदीत हेडफोनऐवजी लाऊडस्पीकर आॅन करून गाणे ऐकत होत्या.
स्पिरिट एअरलाईनचे प्रवक्ते पॉल बेरी यांनी दिलेल्या महितीनुसार, प्रवाशांनी त्यांना आवाज बंद करण्याची विनंती केली; मात्र त्यांनी याला साफ नकार दिला. एवढेच नाही तर स्पीकर वर धरून इतर प्रवाशांना चिथावणी देऊ लागल्या.
यामुळे तीन महिलांच्या एका गटासोबत त्यांचा वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढला आणि हाणामारी सुरू झाली. काही जणांनी मोबाईल कॅमेºयात हे भांडण रेकॉर्ड केले.
स्थिती हाताबाहेर जाताना दिसताच विमान कर्मचाऱ्यांनी एअरपोर्ट पोलिसांना बोलावले. त्या पाच जणींचे घमासान भांडण पाहून पोलिसही चक्रावून गेले. अखेर त्यांनी पाचही महिलांना विमान बाहेर केले. एफबीआयद्वारे या प्रकाराची चौकशी करण्याचा विचार नंतर रद्द करण्यात आला.
पोलिस अधिकारी रॉब पेड्रेगॉन यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. रागाच्या भरात लोकांचा ताबा सुटतो. अशा घटना तर होतच असतात.