'या' क्षेत्रात काम करणाऱ्यांचं लग्नानंतरही होऊ शकतं अफेअर - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:20 PM2019-11-01T15:20:06+5:302019-11-01T15:25:36+5:30

एखाद्या नात्यात जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दगा देत असेल याला वेगवेगळी कारणे असू शकतात.

Study says people of these professions have most chance to involve extra marital affairs | 'या' क्षेत्रात काम करणाऱ्यांचं लग्नानंतरही होऊ शकतं अफेअर - रिसर्च

'या' क्षेत्रात काम करणाऱ्यांचं लग्नानंतरही होऊ शकतं अफेअर - रिसर्च

Next

(Image Credit : indiamart.com)

एखाद्या नात्यात जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दगा देत असेल याला वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यात हे तपासून बघण्यासाठी काही तंत्रही नाही की, तुमच्यासोबतही दगा होईल. मात्र, एक असा रिसर्च समोर आला आहे, ज्यात सांगितलं की, कसं व्यक्तीचं प्रोफेशन एक असं फॅक्टर आहे, जे हे डिसाइड करतं की, ती व्यक्ती पार्टनरसोबत दगा करणार की नाही.  

काय सांगतो रिसर्च?

विवाहित लोकांची डेटिंग साइट ऐशले मेडिसनने १ हजारपेक्षा जास्त यूजर्ससोबत एक सर्व्हे केला. ज्यातून समोर आलं आहे की, या १३ क्षेत्रात काम करणारे लोक आपल्या पार्टनरसोबत दगा करू शकतात.

कोणते क्षेत्र?

या यादीत राजकारण हे १३व्या स्थानावर आहे. पण यात सर्व्हेत सहभागी लोकांपैकी केवळ १ टक्के लोकच राजकारणात होते. इतर क्षेत्र ज्यांना खाली स्थान देण्यात आलंय त्यात अ‍ॅग्रीकल्चर, लीगल सेक्टर, आर्ट्स आणि एन्टरटेन्मेंट यांचा समावेश होता.

मार्केटिंग, सोशल वर्क, हॉस्पिटॅलिटी वगैरे

काही प्रोफेशनल्सना आपल्या पार्टनर्ससोबतच चांगले संबंध ठेवण्यासाठी चांगले सोशल स्किल्स हवे असतात. सर्व्हेत ४ टक्के महिला सहभागी आणि ८ टक्के पुरूष सहभागी जे मार्केटिंग आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रात काम करत होते, त्यांना नववं स्थान मिळालं. यादीत दुसरी क्षेत्रे सोशल वर्क, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी होते.

फायनान्स आणि एज्युकेशन

यादीत सहभागी ८ टक्के महिला आणि ९ टक्के पुरूष असे होते जे फायनान्स सेक्टरमध्ये काम करत होते. या डेटिंग सर्व्हिसशी संबंधित ४ टक्के लोक एज्युकेशन सेक्टरमधील होते.

उद्योजक

स्वत:चं काम सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघणं आणि नवीन लोकांना भेटणं गरजेचं असतं. कधी-कधी संपूर्ण दिवसभर घराबाहेर राहणं आणि वर्क पार्टनरसोबत वेळ घालवणं धोक्याची घंटा ठरू शकते. या यादीत उद्योजक हे चौथं सर्वात पॉप्युलर प्रोफेशन होतं.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मेडिकल

आयटी सेक्टर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होतं आणि मेडिकल दुसऱ्या क्रमांकावर. सर्वात हैराण करणारी बाब ही होती की, या क्षेत्रातील महिलांची टक्केवारी जास्त होती. यात महिला २३ टक्के होत्या तर पुरूष ५ टक्के होते.

ट्रेड्स

ट्रेड्स(ज्यात कन्स्ट्रक्शन, प्लंबिंग, वेल्डिंग)चे यूजर्स सर्वात जास्त होते. यात ४ टक्के महिला होत्या तर २९ टक्के पुरूष होते.


Web Title: Study says people of these professions have most chance to involve extra marital affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.