या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 02:21 PM2018-05-16T14:21:06+5:302018-05-16T15:19:33+5:30

खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे.

Talk about these things before getting married | या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

Next

लग्न हा कुणाच्याही आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. लग्न करण्याआधी आपण अनेक गोष्टी बघतो आणि समजून घेतो. त्यानंतरच आपण कुणासोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

1) आर्थिक स्थिती -

तुम्हाला कितीही चांगली सॅलरी मिळत असेल तरीही तुमच्या नव्या आयुष्यात पैशांबाबत काय अपेक्षा आहेत? याबाबत पार्टनरसोबत बोला. कोणत्याही नात्यात पैशांबाबत बोलणे जरा विचित्र वाटेल पण यावर बोलणे फार गरजेचे आहे. दोघांनी बोलून व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. 

2) फॅमिली प्लॅनिंग -

मुल झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यामुळे दोघांनी याविषयावर बोलून निर्णय घेणे गरजेचे आहे. लग्नाआधीच यावर बोलल्यास अधिक चांगले कारण लग्नानंतर याबाबत अनेक मतभेद होऊ शकतात. अशावेळी कमीत कमी एकमेकांची याबाबतची मते जाणून घ्या. 

3) दोघांपैकी एकच कमावत असेल तर -

घर चालवण्यासाठी तुम्ही दोघांनीही नोकरी करणे योग्य होईल की, एकाच्या पगारात भागणार आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला हाऊसवाईफ व्हायला आवडेल की, तिला काम करायचंय? या गोष्टीही बोलायला हव्यात. 

4) पर्सनल स्पेस -

पर्सनल स्पेसबाबत आधीच दोघांनी बोललेलं अधिक बरं. पर्सनल स्पेसबाबत तुमच्या पार्टनरचा काय विचार आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उगाच नंतर अडचणी निर्माण होण्यापेक्षा आधीच ही गोष्ट क्लिअर केलेली बरी. 

5) घरातील कामकाजात दोघांची भूमिका -

काय ती पारंपारिक पद्धतीने घर चालवण्यात सहज आहे किंवा घरातील जबाबदारी दोघांमध्ये बरोबरीत वाटली जावी? यावरही संवाद व्हायला हवा. दोघेही नोकरी करणारे असाल तर यावरुन वाद होण्याची शक्यता जास्त आहे.

7) दोघेही नोकरी करणार तर घर कोण सांभाळणार?

जर तुम्ही दोघांनीही लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग मुलं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार? याचाही विचार करा. नाहीतर मुलांचं संगोपन नीट करता येणार नाही. यावरुन दोघांमध्ये वाद पेटतील. 

8) भांडणं झाल्यावर काय?

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात भांडणासारख्या गोष्टी असू नये. पण संसार म्हटला की, काही गोष्टींमुळे भांडणं होत असतात. अशावेळी काय भूमिका घ्यावी, परिस्थिती कशी हाताळावी याचाही विचार होणे गरजेचे आहे.
 

Web Title: Talk about these things before getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.