TECH VIDEO : आता गुगल मॅपद्वारे शेअर करा ‘रिअल टाइम’ लोकेशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 11:50 AM2017-03-24T11:50:21+5:302017-03-24T17:21:54+5:30

याद्वारे गुगल कॉन्टॅक्टवर असणाऱ्या मित्रांना थेट लोकेशन शेअर करता येईल. याशिवाय इतरांना याची लिंक शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे

TECH VIDEO: Now share 'Real Time' Locations via Google Maps! | TECH VIDEO : आता गुगल मॅपद्वारे शेअर करा ‘रिअल टाइम’ लोकेशन !

TECH VIDEO : आता गुगल मॅपद्वारे शेअर करा ‘रिअल टाइम’ लोकेशन !

Next
ong>-Ravindra More
गुगल मॅप्सवर नुकतेच ‘रिअल टाईम’ लोकेशन शेअर करणारे फीचर लॉन्च झाले असून याद्वारे आता कुणीही आपल्या मित्रांसोबत अगदी ‘रिअल टाईम’ या पध्दतीने लोकेशन शेअर करू शकणार आहे.
अ‍ॅँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या यूजर्ससाठी गुगलने हे फीचर प्रदान केले असून यासाठी आपणास गुगल मॅपच्या साईड मेन्यूवर जाऊन ‘शेअर लोेकेशन’ या पयार्यावर क्लिक क रायचे आहे. यानंतर नेमके कुणासोबत लोकेशन शेअर करायचे? याचे पर्याय समोर येतील. यात गुगल कॉन्टॅक्टवर असणाऱ्या मित्रांना थेट लोकेशन शेअर करता येईल. याशिवाय इतरांना याची लिंक शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे समोरील व्यक्ती हा किती वेळेपर्यंत लोकेशन पाहू शकेल? याची सेटींग करण्याची सुविधादेखील यात असेल. तसेच आपण शेअर केलेल्या या माहितीच्या आधारे कोण आपल्या लोकेशनला पाहत आहे? ही माहिती जाणून घेण्यासाठी संबंधीत युजरला गुगल मॅप्सवर असणाऱ्या ‘कंपास’ या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
याशिवाय गुगल मॅप्सवर आता कुणीही आपल्या यात्रांबाबत माहिती देऊ शकेल. या अंतर्गत कुणीही नेव्हिगेशनच्या खालील बाजूस ‘मोअर’ यावर क्लिक करून ‘शेअर ट्रीप’ या पयार्यावर क्लिक करू शकेल. यामुळे संबंधीत युजर हा पर्यटन करतांना नेमका कुठे-कुठे जातोय याची माहिती मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा..

Web Title: TECH VIDEO: Now share 'Real Time' Locations via Google Maps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.