आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ काय शौर्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:54 PM2017-09-22T16:54:47+5:302017-09-22T16:57:25+5:30

तुम्ही जर असं काही करीत असाल, तर गमवाल आपल्या मुलांना..

..then you will lose your children | आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ काय शौर्य?

आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ काय शौर्य?

ठळक मुद्देआपल्याच मुलांना नमवण्यात शूरपणा नाही, पराभव आपलाच आहे.मुलांना अद्वातद्वा बोलू नका आणि त्यांना मारू तर अजिबात नका.पालकांविषयी मुलांच्या मनात एकदा का अढी बसली की ती निघणं महामुष्किल.

- मयूर पठाडे

‘नाही ना पप्पा.. नाही ना मम्मी. नाही मी पुन्हा असं करणार. तुम्ही सांगाल ते सगळं ऐकेन. रोज अभ्यास करेन. चांगले मार्क्स मिळवीन.. खरंच सांगतो.. चुकलो, सॉरी..’
- अनेक घरांमध्ये आई-वडिलांनी मुलांवर रुद्रावतार धारण केल्यावर हे शब्द ऐकायला येतात. दिनवाणा चेहरा करून आणि रडत रडत मुलं आपल्या जमदग्नी आई-वडिलांसमोर विनवणी करीत असतात आणि पालक मुलावर ओरडत असतात, सांग, करशील पुन्हा असं?.. तोंड उचकटून पुन्हा सॉरी म्हणतो’.. पालकांचा तोंडाचा पट्टा सुरूच असतो..
जोपर्यंत मुलाला पूर्ण अर्थानं ‘नमवलंय’ याची खात्री होत नाही, तोपर्यंत पालकांचा तोंडाचा आणि बºयाचदा हाताचा पट्टाही सुरूच असतो. सगळेच पालक असेच असतात असं बिलकुल नाही, पण अनेक घरांत आजही ही स्थिती आहे. कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्या मुलाला ‘नमवलं’ तरंच त्यांचा हा राग शांत होतो.
अभ्यासकांनीही ही वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवलं आहे आणि याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. जे पालक आपल्या मुलांबाबत असं करत असतील, त्यांनी वेळीच थांबाव, योग्य तो विचार करावा, आपल्या वर्तनात आधी सुधारणा करावी आणि मुलाबाबतचे आपले संबंध तसेच संवाद मधुर करावा असा कळकळीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मुलांच्या वर्तणुकीबद्दल आपण नाराज असतो, त्याबद्दल आपण त्रागा करतो, पण आपल्या वर्तनाची आपण कधी तपासणी केलीय? आणि मुलांना, त्यातही आपल्याच मुलांना ‘नमवण्यात’ कुठलं आलंय शौय?.. तेव्हा हा प्रकार ताबडतोब सोडा आणि आपलीही वागणूक ‘सभ्य’ मुलासारखी ठेवा, असं आवाहन अभ्यासकांनी पालकांना केलं आहे.
मुलांना मिळत असणाºया वागणुकीबद्दल भले उघडपणे ते काही बोलणार नाहीत, पण पालकांबद्दलचा त्यांच्या मनातला दुरावा आपोआपच वाढत जाईल. नंतरची त्यांची वर्तणूक अत्यंत चांगली असली, तरी जायचा तो तडा जातोच.. त्यामुळे सावधान..

Web Title: ..then you will lose your children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.