​‘या’ ५ प्रकारचे मित्र अवश्य असावेत आपल्या आयुष्यात !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 08:06 AM2017-09-23T08:06:16+5:302017-09-23T13:36:16+5:30

मित्र बनविताना मात्र काळजीही घेणे महत्त्वाचे आहे. मित्रदेखील विविध प्रकारचे असतात. आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे मित्र असावेत याविषयी आज आम्ही आपणास माहिती देत आहोत.

There should be 5 types of friends in your life! | ​‘या’ ५ प्रकारचे मित्र अवश्य असावेत आपल्या आयुष्यात !

​‘या’ ५ प्रकारचे मित्र अवश्य असावेत आपल्या आयुष्यात !

Next
ल्या आयुष्यात मैत्री खूप आवश्यक असते आणि असे म्हटले जाते की, ज्याच्या आयुष्यात मित्र नसतील त्याचे आयुष्य रेगिस्तानसारखे असते. विशेष म्हणजे मैत्रीचे महत्त्व बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांद्वारेही सांगण्यात आले आहे. ‘थ्री इडियट’ या चित्रपटात तर खऱ्या मित्राची संकल्पना अधिक स्पष्ट होताना आपणास दिसते. मित्रच असे असतात जे आपल्या आयुष्याला पूर्णत्व आणण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला यशस्वी बनविण्यासाठी उपयुक्त ठरतात. आपल्या आयुष्यात जर असे मित्र नसतील तर आपले आयुष्य  अर्धवट गणले जाते. यासाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काही वेळ काढून मित्र बनवा. 
मित्र बनविताना मात्र काळजीही घेणे महत्त्वाचे आहे. मित्रदेखील विविध प्रकारचे असतात. आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे मित्र असावेत याविषयी आज आम्ही आपणास माहिती देत आहोत.

* हुशार मित्र 
आपल्या आयुष्यात अडचणी येतच राहतात. बऱ्याचदा या अडचणी सोडविताना आपण हतबल होतो. अशावेळी हुशार, बुद्धिवान आणि अनुभवी मित्र जर असेल तर तो आपल्या अडचणी सोडविण्यास मदत करु शकतो. यासाठी आपणास एकतरी बुद्धिमान मित्र असावा. 

* विनोदी मित्र  
आपल्या आयुष्यात फक्त काम आणि कामच असेल आणि कोणत्याच प्रकारची मजाक / विनोद होत नसतील तर आपले आयुष्य कंटाळवाणे होऊ शकते. अशावेळी आपल्या बोरिंग आयुष्यात रंग भरण्यासाठी विनोद, मौज-मजा होण्यासाठी एका विनोदी मित्राची आवश्यकता असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य तर येईलच शिवाय आयुष्य जगायलाही उमेद मिळेल.    

* प्रामाणिक मित्र
काही मित्र आपल्याला नेहमी मोटिव्हेट करतात आणि चांगल्या-वाईट कामातही सपोर्ट करतात, मात्र असा सपोर्टही काय कामाचा जो भविष्यात चुकीचा ठरेल आणि योग्य तसेच अयोग्य काय याचे ज्ञानही नसेल. अशावेळी आपले आयुष्य यशस्वी होण्यासाठी आपणास एक प्रामाणिक आणि निष्पक्ष मित्राची आवश्यक ता असते जो आपणास योग्य मार्ग दाखवू शकतो.   
 
* रिलेशनशिप एक्सपर्ट मित्र 
बऱ्याचदा आपले आपल्या आई-वडिलांशी किंवा आपल्या गर्लफ्रें डशी वाद होतो आणि आपल्या नात्यात अबोला निर्माण होतो. अशावेळी असा मित्र आपणास खूप मदत करु शकतो. तो त्याच्या सल्लयानुसार आपले बिघडलेले नातेसंबंध सुधारु शकतो.  

* कौतुक / आदर करणारा मित्र  
बऱ्याचदा आपण आयुष्यात छोटे-मोठे यश संपादन करतो, त्यावेळी कौतुक करणारा मित्र जवळ असेल तर आपल्याल्या अजून जास्त प्रेरणा मिळते आणि आपणास यशोशिखर गाठायला सोपे होते.   

Web Title: There should be 5 types of friends in your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.