फारच संशयी असतात 'या' राशींच्या मुली; तुमच्या पार्टनरची रास आहे का यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:59 PM2019-09-16T14:59:28+5:302019-09-16T15:00:27+5:30
कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात.
कोणत्याही नात्यामध्ये संशय आला की, नातं आणखी बिघडतं. संशयाला काही औषध नसतं, असं आपण अनेकदा ऐकतो. तसेच असं सांगितलं जातं की, नात्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिला संशय घेतात. अशातच महिला आपल्या मनातील संशय दूर करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. एवढंच नाहीतर आपला संशयाचं निरसन करून घेतात. पण या प्रयत्नात अनेकदा पार्टनरसोबत भांडणही होण्याची शक्यता असते. असं अजिबात नाही की, पुरूषांच्या मनात संशय नसतो.
आज आपण जाणून घेऊया काही राशींच्या महिलांबाबत ज्या संशयी असतात. तुम्ही राशीवरून ओळखू शकता की, तुमची गर्लफ्रेंड किंवा पत्नी संशयी आहे की नाही?
मेष राशी
मेष राशीच्या मुली हळव्या स्वभावाच्या असतात. त्याचबरोबर त्या आपल्या पार्टनरवर फार प्रेम करतात. असं सांगितलं जातं की, अनेकदा त्यांचं हेच प्रेम त्यांना संशयी बनवतं. आपल्या पार्टनरबाबत या महिला एवढ्या इन्सिक्योअर होतात की, त्यांच्या मनातील संशय वाढतो.
मकर राशी
मकर राशीच्या मुली आपल्या पार्टनरबाबत फार पझेसिव्ह असतात. त्यामुळे त्या सतत त्यांच्यावर नजर ठेवून राहतात. असं सांगितलं जातं की, या महिला पार्टनरवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या जवळच्या मित्रांशीही मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.
कर्क राशी
कर्क राशीच्या मुलीं स्वभावानेच संशयी असतात. असं सांगितलं जातं की, त्या नेहमी आपल्या पार्टनरवर लक्ष ठेवतात.
धनु राशी
असं सांगितलं जातं की, धनु राशीच्या मुली संशयी असतात. आपला संशय दूर करण्यासाठी या आपल्या पार्टनरवर सतत लक्ष ठेवतात. एवढचं नाहीतर पार्टनरचा फोन चेक करण्यापासून ते त्यांचा पाठलाग करेपर्यंत अनेक गोष्टी करतात.
मीन राशी
असं सांगितलं जातं की, मीन राशीच्या महिला नेगेटिव्ह नेचरच्या असतात. त्या आपल्या पार्टनरबाबतही इन्सिक्योअर असतात. त्यांना असं वाटतं की, त्यांना त्यांचा पार्टनर धोका तर नाही देणार. याच कारणामुळे या सतत आपल्या पार्टनरवर संशय घेत असतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)