'या' 8 गोष्टी सांगतील ते तुमच्यासाठी मिस्टर राइट आहेत की रॉन्ग?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:35 AM2019-09-24T11:35:31+5:302019-09-24T11:42:14+5:30
अनेकदा मुली आपल्या पार्टनरबाबत फार विचार करतात. तो आपली काळजी घेईल की नाही? त्यांची आयुष्यभर साथ देईल की नाही. याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही अनेकदा होत असतो.
अनेकदा मुली आपल्या पार्टनरबाबत फार विचार करतात. तो आपली काळजी घेईल की नाही? त्यांची आयुष्यभर साथ देईल की नाही. याचा परिणाम त्यांच्या नात्यावरही अनेकदा होत असतो. कारण प्रत्येक वेळी त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार सुरू असतो की, त्यांचा पार्टनर खरचं त्यांच्यावर प्रेम करतो की नाही? हे जाणून घेण्यासाठी त्या वाटेल ते करण्यासाठी तयार होतात. त्यामुळे अनेकदा मुलंही वैतागतात आणि नात्यामध्ये दुरावा येतो. अनेकदा मिस्टर राइटही याच कारणामुळे सोडून जातात. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुमचा पार्टनर तुमच्यासाठी मिस्टर राइट आहे की नाही, हे जाणून घेणं शक्य होणार आहे.
एकमेकांच्या विचारांचा आदर करणं
जर तुम्ही दोघं एकमेकांचं बोलणं ऐकत असाल आणि समजून घेत असाल तर तुम्हा दोघांचं नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते. नात्यामध्ये एकमेकांना आदर देणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
तुमचा वाईट दिवस त्यांच्यामुळे चांगला होतो
अनेकदा आपल्या आयुष्यातील काही दिवस फार वाईट असतात. तेव्हा तुम्हाला फक्त तुमचीच आठवण येत असते आणि जसा त्यांचा कॉल येतो किंवा ते तुम्हाला भेटतात. तर तुमचा मूड चुटकीसरशी ठिक होतो.
तुम्ही दोघं जर उत्तम मित्र असाल तर
तुमच्या दोघांमध्ये प्रेमाच्या नात्यापेक्षाही जर मैत्रीचं नातं घट्ट असेल आणि तुमच्या मनातील गोष्टी कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना सांगत असाल तर तुमचं नातं खरंच फार सुंदर आहे.
कम्फर्ट
तुम्ही जर त्यांच्यासोबत असाताना स्वतःला फार कम्फर्ट फिल करत असाल ता हा तुमच्यासाठी बेस्ट पार्टनर आहे हे समजून जा. म्हणजेच, तुम्ही त्यांच्याशी कोणतीही गोष्ट निसंकोचपणे बोलू शकता, त्यांच्यासोबत तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करू शकता.
जबाबदारी
तुम्ही तुमच्या नात्यामध्ये एकमेकांप्रती असलेली आपली जबाबदारी समजून घेत असाल. तसेच तुम्हाला जर माहीत असेल की, त्यांच्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करूच शकत नाही. तर या गोष्टींमधून त्यांच्या प्रती असलेलं तुमचं प्रेम समोर येत असतं.
एकमेकांपासून लांब असताना आठवण येते
एकमेकांपासून लांब असताना तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप मिस करता का? म्हणजेच, तुमचा पार्टनर तुमच्यासाठी मिस्टर राइट आहे.
त्यांच्या कुटुंबियांचीही घेता काळजी?
जर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेत असाल आणि त्यांच्या कुटुंबाती व्यक्ती जर तुम्हाला आपल्या वाटत असतील तर तुम्ही त्यांचं मन जिंकून घ्याल.
तुमचं भांडणातही असेल प्रेम...
जर तुम्ही भांडताना हसत असाल आणि त्यानंतर भांडणाचं कारणचं विसरत असाल तर तोच तुमचा मिस्टर राइट आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)