ऑनलाईन डेटिंगच्या या विचित्र पद्धती तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 03:02 PM2018-06-25T15:02:41+5:302018-06-25T15:03:11+5:30
डेटिंग करणं अनेकांसाठी सोपं झालं आहे. पण अलिकडे डेटिंगचे काही विचित्र आणि आश्चर्यजनक असे ट्रेंड आले आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत हे विचित्र ट्रेंड....
(Image Credit: kings.al)
आजकाल ऑनलाईन डेटिंगकडे तरुणाई फारच आकर्षित होत आहे. 100 पेक्षा जास्त डेटिंग अॅप्स आणि वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ज्यामुळे डेटिंग करणं अनेकांसाठी सोपं झालं आहे. पण अलिकडे डेटिंगचे काही विचित्र आणि आश्चर्यजनक असे ट्रेंड आले आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत हे विचित्र ट्रेंड....
1) बेंचिंग डेटिंग ट्रेन्ड
अनेकदा असं पाहिलं जातं की, काही लोक हे एकाच व्यक्तीला अनेकडा डेट करतात. रोमॅंटिक मेसेज पाठवतात. पण तरीही ते कोणत्याही प्रकारची कमिटमेंट करण्याला किंवा त्या नात्याला नाव देण्याला घाबरतात. यावरुन हे स्पष्ट होतं की, अशा लोकांना आणखी काही लोकांना डेट करायचं असतं आणि त्यानंतर आपल्यासाठी एकाला निवडायचं असतं. यालाच ऑनलाईन डेटिंग ट्रेन्डमध्ये बेंचिंग डेटिंग म्हणतात.
2) ब्रेडक्रंबिंग डेटिंग ट्रेन्ड
ऑनलाईन डेटिंगच्या विश्वात ब्रेडक्रंबिंग फारच प्रचलित ट्रेन्ड आहे. अर्बन डिक्शनरीनुसार, जेव्हा दोन लोकांपैकी कुणी एक व्यक्ती आपल्या नात्याला नाव देण्याच्या अपेक्षेने आपल्या पार्टनरकडे प्रमाणापेक्षा जास्त लक्ष देऊ लागतात. याला ऑनलाईन डेटिंग विश्वात ब्रेडक्रंबिंग असे म्हणतात.
3) शेव्ह्डकिंग डेटिंग ट्रेन्ड
काही मुली दाढी असलेल्या तरुणांकडे अधिक आकर्षित होतात. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे. ही एकप्रकारची फॅन्टसी असते.
4) घोस्टिंग डेटिंग ट्रेन्ड
जर तुम्ही डेट करत असलेली व्यक्ती एकाएकी काहीही न सांगता तुमच्याशी बोलणं बंद करत असेल तर याला घोस्टिंग असे म्हटले जाते.
5) हॉन्टिंग डेटिंग ट्रेन्ड
ऑनलाईन डेटिंगमध्ये हा प्रकारही अधिक बघायला मिळतो. जेव्हा तुमचा एक्स बॉयफ्रेन्ड, पती किंवा पत्नी सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो करतात आणि तुमची प्रत्येक स्टोरी लाईक करतात. त्याला हॉन्टिंग म्हणतात. यावरुन हे कळत नाही की, तुमच्या एक्सच्या मनात अजूनही तुमच्या विषयी प्रेम आहे की, केवळ मित्र म्हणून त्यांना सोबत हवी आहे.
6) फ्लॅक्सटिंग डेटिंग ट्रेन्ड
सोशल मीडिया फ्लॅक्सटिंग फारच प्रसिद्ध आहे. प्रत्येकानेच कधी ना कधी हे केलं असेल. सोशल मीडियात लोक इतरांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्या फोटोसह लांबच लांब पोस्ट लिहितात. यालाच फ्लॅक्सटिंग म्हणतात.